राधिका यादवचा व्हायरल व्हिडीओ
राधिका यादवचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. ज्यामध्ये ती इनाम-उल-हक (inam-ul-haq) नावाच्या तरुणासोबत बाईकवर फिरताना दिसली होती. राधिकाने अभिनेता इनाम-उल-हक सोबत 'कारवाँ' या गाण्यात मुख्य अभिनेत्री म्हणून काम केले होते. त्याचा हा रील होता. त्यानंतर आता या प्रकरणाला प्रेमाच्या अँगलने जोडलं जात आहे. त्यावर इनाम-उल-हक याने स्वत: माध्यमांना दोघांच्या नात्याविषयी माहिती दिली.
advertisement
काय म्हणाला इनाम-उल-हक?
मी दिल्लीमधील एका टेनिस सामन्यात राधिकाला भेटलो होतो. त्यानंतर राधिकाने स्वतः अभिनयात रस दाखवला. माझ्या टीमला ती गोंडस वाटली. त्यानंतर राधिका यादवची कारवाँ या म्युझिक व्हिडिओसाठी निवड झाली. तिची निवड झाल्यानंतर तब्बल चार ते पाच शुटिंग देखील झाली. दिल्लीत झालेल्या भेटीनंतर आत्तापर्यंत राधिकासोबत माझं बोलणं झालं नाही.
इन्टाग्रामवर एकमेकांना फॉलो
आम्ही नक्कीच इन्टाग्रामवर एकमेकांना फॉलो करत होतो. एक दोनदा आम्ही स्टोरीला रिप्लाय देखील केला होता. पण कधी लांबलचक चॅट देखील आमची झाली नाही, असंही इनाम-उल-हक म्हणाला. शूटिंग दरम्यान तिचे कुटुंबीयही उपस्थित होते. तिने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर गाणे शेअर न करण्याचे काही वैयक्तिक कारण सांगितलं होतं, असा खुलासा देखील इनाम-उल-हकने केला आहे.
42 सेकंदांचा रील अन्...
दरम्यान, माझा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही. राधिकाचे सोशल मीडिया अकाउंट नाही. युट्यूबवर फक्त एक व्हिडिओ क्लिप आहे, म्हणून ती पुन्हा पुन्हा हायलाइट केली जात आहे, असंही इनाम-उल-हक याने म्हटलं आहे. प्रमोशनसाठी 42 सेकंदांचा रील बनवण्यात आला होता. हे गाणे 2 मिनिटे 55 सेकंदांचं आहे, अशी माहिती देखील त्याने दिली.