इश्वरन दोन्ही इनिंगमध्ये फेल
अभिमन्यू इश्वनरला न खेळवताच टीममधून बाहेर केल्यानंतर भारतीय निवड समिती आणि टीम मॅनेजमेंटला टीकेचा सामना करावा लागला, पण दक्षिण आफ्रिका ए विरुद्धच्या सामन्यात दोन्ही इनिंगमध्ये अभिमन्यूची बॅट शांत राहिली. पहिल्या इनिंगमध्ये फास्ट बॉलर शेपो मोरेकीने त्याला एलबीडब्ल्यू केलं, तर दुसऱ्या इनिंगमध्ये ओकुहले केलेने अभिमन्यूला पुन्हा एलबीडब्ल्यूच केलं. दोन्ही इनिंगमध्ये त्याला खातंही उघडता आलं नाही.
advertisement
इंडिया ए कडून खेळताना अपयशी
देशांतर्गत क्रिकेटमध्ये अभिमन्यू ईश्वरनचा रेकॉर्ड चांगला आहे. पण, तो इंडिया ए कडून खेळताना त्याला यश येत नाहीये. गेल्या वर्षी बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीपूर्वी त्याला संधी मिळाली होती, पण दोन सामन्यांच्या चार इनिंगमध्ये त्याला 36 रन करता आल्या. इंग्लंड दौऱ्यापूर्वी इंग्लंड लायन्सविरुद्ध त्याने चार इनिंगमध्ये 11, 80, 8 आणि 68 रन केल्या. या सीरिजमधल्या खेळपट्ट्या बॅटिंगसाठी सोप्या होत्या, पण तरीही अभिमन्यू शतक ठोकू शकला नाही. सप्टेंबरमध्ये ऑस्ट्रेलिया ए विरुद्ध त्याने 44 रन केल्या, पण पडिक्कल, ध्रुव जुरेल यांनी शतकं केली, तर नारायण जगदीसन आणि साई सुदर्शनने अर्धशतकी खेळी केल्या.
इंडिया ए मजबूत स्थितीमध्ये
ध्रुव जुरेलच्या शतकाच्या मदतीने दक्षिण आफ्रिका एविरुद्धच्या सामन्यात भारताने पहिल्या इनिंगमध्ये 255 रन केल्या. यानंतर दक्षिण आफ्रिका ए ची इनिंग 221 रनवर संपुष्टात आली. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा इंडिया एचा स्कोअर 78/3 एवढा आहे. केएल राहुल 26 रनवर खेळत आहे. इंडिया ए ची आघाडी 112 रनवर पोहोचली आहे.
