ऑस्ट्रेलियासमोर भारताने 280 धावांचे लक्ष्य ठेवले होते.या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची सूरूवात खराब झाली होती. कारण ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर आलेक्स यंग अवघ्या 4 धावांवर बाद झाला होता.त्याच्यानंतर आलेक्स टर्नर आणि स्टीव्हन होगनने ऑस्ट्रेलियाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला होता. पण स्टीव्हन होगन देखील 9 धावांवर बाद झाला.या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाला पार्टनरशीप करण्याची संधीच दिली नाही आणि एकामागून एक विकेट काढले.
advertisement
ऑस्ट्रेलियाचा विल देखील 15 धावांवर बाद झाला. त्याच्यानंतर ऑस्ट्रेलियाचा डाव एका बाजूने सावरत असलेला आलेक्स टर्नर 32 धावांवर बाद झाला. ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूने केलेली ही एकमेव सर्वाधिक धाव होती. त्यानंतर टॉम होगनने 28 धावा केल्या.यानंतर मैदानात उतरलेले खेळाडून एकेरी धाव करुन बाद झाले. अशाप्रकारे भारताने ऑस्ट्रेलियाला 113 धावात ऑलआऊट केले होते. टीम इंडियाकडून खिलान पटेलने 4 सर्वाधिक विकेट घेतल्या.या त्याच्या गोलंदाजीमुळे त्याने मॅच फिरवण्यात मोलाचा वाटा उचलला. या व्यतिरीक्त उद्धव मोहनने 3 आणि कनिष्क चौहाने 2 विकेट घेतल्या होत्या.
भारताने उभारला धावांचा डोंगर
टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना 280 धावा ठोकल्या होत्या.टीम इंडियाच्या डावाची सूरूवात फारशी चांगली झाली नव्हती. वैभव सुर्यवंशी 16 धावांवर बाद झाला.तर कर्णधार आयुष म्हात्रे 4 धावांवर बाद झाला. त्यामुळे सलामीवीर बाद झाल्यानंतर टीम इंडिया संकटात असताना वेदांत त्रिवेदीने 86 धावांची अर्धशतकीय खेळी केली होती. त्याच्यासोबत राहुल कुमारने 62 धावांची अर्धशतकीय खेळी केली. आणि विहान मल्होत्राने 40 धावा केल्या होत्या. तर बाकी इतर खेळाडूंनी फारशा धावा केल्या नव्हत्या.त्यामुळे टीम इंडियाने 50 ओव्हरमध्ये 9 विकेट गमावून 280 धावा ठोकल्या होत्या.
टीम इंडियाने हा सामना जिंकून 3-0 असा मालिका विजय केला आणि ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच मायदेशात वाईटवॉश दिला होता.त्यामुळे खेळाडूंच्या या कामगिरी आता चर्चा होतेय.