TRENDING:

IND vs AFG : टीम इंडियाच्या हातून जाणार अंडर 19 वर्ल्ड कप! सेमी फायनलमधील 5 चूका महागात पडणार

Last Updated:

अंडर 19 वनडे वर्ल्डकपच्या दुसऱ्या क्वार्टर फायनल सामन्यात अफगाणिस्तानच्या संघाने टीम इंडियाची अक्षर धुलाई केली आहे.या धुलाईमुळे अफगाणिस्तानने 50 ओव्हरमध्ये 4 विकेट गमावून 310 धावा केल्या आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
India U19 vs Afghanistan U19, 2nd Semi-Final : अंडर 19 वनडे वर्ल्डकपच्या दुसऱ्या क्वार्टर फायनल सामन्यात अफगाणिस्तानच्या संघाने टीम इंडियाची अक्षर धुलाई केली आहे.या धुलाईमुळे अफगाणिस्तानने 50 ओव्हरमध्ये 4 विकेट गमावून 310 धावा केल्या आहेत.त्यामुळे आता टीम इंडियाला फायनलमध्ये पोहोचण्यासाठी 311 धावा कराव्या लागणार आहेत.अफगाणिस्तानने दिलेले हे धावांचे आव्हान खूपच जास्त आहे, त्यामुळे टीम इंडियासमोर फायनलमध्ये पोहोचण्याचे मोठे आव्हान असणार आहे.दरम्यान या सामन्यात टीम इंडियाकडून कोणत्या चूका झाल्या? हे जाणुन घेऊयात.
ind vs afg 2nd semi final
ind vs afg 2nd semi final
advertisement

फुकटात पाच धावा दिल्या

सामन्यात बॉलरने टाकलेला एक बॉल विकेटमागे ठेवलेल्या अभिग्यान कुंडूच्या हेल्मेटला लागला. नियमानुसार तर हेल्मेटमुळे बॉल अडवला गेला तर फलंदाजी करणाऱ्या टीमला पाच धावा पेनेल्टी म्हणून देण्यात येतात.

अफगाणिस्तानच्या दोन खेळाडूंची शतकीय खेळी

भारताच्या उत्कृ्ष्ट गोलंदाजीविरूद्ध अफगाणिस्तानच्या दोन खेळाडूंनी शतक ठोकली होती. अफगाणिस्तानच्या फैसलने 93 बॉलमध्ये 110 धावांची शतकीय खेळी केली. या खेळीत त्याने 15 चौकार मारले होते. त्याच्यासोबत उझेरूल्लाह निझाने 86 बॉलमध्ये 106 धावांची खेळी केली होती.या दोन शतक टीम इंडियाच फायनलच तिकीट कापू शकतात.

advertisement

आयुश म्हात्रे कॅप्टन्सीत फेल

सेमी फायनल सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार आयुश म्हात्रे कॅप्टन्सीत फेल ठरला आहे. या सामन्यात आयुश म्हात्रे गोलंदाजांचे वेगळं नियोजन करता आले नाही. आयुशने फक्त पाच बॉलर वापरले त्याच स्वत:ही गोलंदाजी केली पण फक्त दोन ओव्हर टाकल्या. आणखी ओव्हर टाकल्या असत्या तर कदाचित त्याला विकेच मिळण्याची शक्यता बळावली असती.कारण मागच्या वेळेस त्याने दोन विकेट काढल्या होत्या.

advertisement

तसेच सेमी फायनल सामन्यात टीम इंडियाचे दोन विकेट टेकर गोलंदाजांना विकेटच मिळाली नाही. हेनील पटेलने मागच्या पाच सामन्यात 11 विकेट घेतल्या होत्या तर आर अम्ब्रीशने 8 विकेट घेतल्या होत्या. या दोन्ही खेळाडूंना विकेट न मिळाल्याने अफगाणिस्तान 300 पार धावा केल्या होत्या.

टीम इंडियाला ओव्हर कॉन्फिडन्स नडला

मागच्या सामन्यात टीम इंडियाने पाकिस्तानचा पराभव केला होता. या पराभवानंतर टीम इंडिया हवेत गेली होती. त्याच ओव्हर कॉन्फिडन्सने टीम इंडिया अफगाणिस्तानविरूद्ध खेळली याचा त्यांना या सामन्यात फटका बसल्याचे दिसते.

advertisement

अफगाणिस्तानचा पहिला डाव 

दुसऱ्या क्वार्टर फायनल सामन्यात अफगाणिस्तानने टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला होता.हा निर्णय अफगाणिस्तानने योग्यही करून दाखवला कारण त्यांच्या डावाची सूरूवात खूपच चांगली झाली होती. अफगाणिस्तानकडून ओस्मान सदत आणि खालीद अहमदझाई फलंदाजीला उतरले होते. दोघांनी अफगाणिस्तानच्या डावाची चांगली सुरूवात केली होती पण दोघांनाही मोठ्या धावा करता आल्या नाही.

advertisement

अफगाणिस्तानकडून सलामीवर ओसमान सदतने 39 धावांची तर खालीदने 31 धावांची सर्वाधिक खेळी केली. त्यानंतर फैसल शिनोझादा आणि उझेरूल्लाह निझाईने अफगाणिस्तानचा डाव सावरला होता. दोघांनी यावेळी टीचून फलंदाजी करून 20 ओव्हर भारताला विकेटच काढून दिली नव्हती. या दरम्यान फैसलने 93 बॉलमध्ये 110 धावांची शतकीय खेळी केली. या खेळीत त्याने 15 चौकार मारले होते. त्याच्यासोबत निझाने 101 धावांची शतकीय खेळी केली होती. या खेळीच्या बळावर आता अफगाणिस्तानने 50 ओव्हरमध्ये 4 विकेट गमावून 310 धावा केल्या आहेत.त्यामुळे आता टीम इंडियाला फायनलमध्ये पोहोचण्यासाठी 311 धावा कराव्या लागणार आहेत.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
Online शेतमाल विकताय? हा स्कॅम तुमच्यासोबतही होऊ शकतो, हे एकदा वाचाच
सर्व पहा

भारतासमोर आता 311 धावांचे आव्हान आहे. हे आव्हान खूप मोठे आहे.त्यामुळे आता जर टीम इंडियाला फायनल गाठायची असेल तर त्यांना हे लक्ष्य पुर्ण करावे लागणार आहे. जर टीम इंडियाने हा सामना जिंकला तर फायनलमध्ये टीम इंडियाची लढत ही पहिल्या क्वार्टर फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाचा पराभव करून विजेत्या ठरलेल्या इंग्लंडशी होणार आहेत. त्यामुळे आता टीम इंडिया आता अफगाणिस्तानला हरवून फायनलला पोहोचते का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs AFG : टीम इंडियाच्या हातून जाणार अंडर 19 वर्ल्ड कप! सेमी फायनलमधील 5 चूका महागात पडणार
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल