इनिंगच्या सातव्या ओव्हरच्या दुसऱ्या बॉलला अभिषेक शर्माने झम्पाच्या बॉलिंगवर सिक्स मारला. झम्पाचा या सामन्यातला हा पहिलाच बॉल होता. यानंतर झम्पाने ओव्हरचा चौथा बॉल पुन्हा त्याच टप्प्यावर टाकला, पण त्याने बॉलचा स्पीड कमी केला, ज्यामुळे अभिषेक शर्मा फसला. या बॉलवरही सिक्स मारण्यासाठी अभिषेक मोठा शॉट खेळला, पण बॉलचा स्पिड कमी असल्यामुळे अभिषेकचा शॉट चुकला आणि टीम डेव्हिडने त्याचा कॅच पकडला. 21 बॉलमध्ये 28 रन करून अभिषेक आऊट झाला.
advertisement
अभिषेकच्या विकेटनंतर टीम इंडियाला एकामागोमाग एक धक्के लागले. शिवम दुबे 22, शुभमन गिल 46, सूर्यकुमार यादव 20 आणि तिलक वर्मा 5 रनवर आऊट झाले. 15 रनमध्येच टीम इंडियाने 4 विकेट गमावल्या, तसंच शेवटच्या 6 ओव्हरमध्ये भारताला फक्त 46 रन काढता आल्या. 20 ओव्हरमध्ये भारताने 8 विकेट गमावून 167 रन केल्या. ऑस्ट्रेलियाकडून नॅथन एलिस आणि एडम झम्पाने 3-3 विकेट घेतल्या, तर झेवियर बार्टलेट आणि मार्कस स्टॉयनिस यांना 1-1 विकेट मिळाली.
ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकला
या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मिचेल मार्शने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला. टीम इंडियाने त्यांच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल केलेला नाही, तर ऑस्ट्रेलियाच्या टीममध्ये चार बदल आहेत. 5 टी-20 मॅचच्या या सीरिजची पहिली मॅच पावसामुळे रद्द झाली तर दुसरा सामना ऑस्ट्रेलियाने आणि तिसरा सामना भारताने जिंकला.
भारताची प्लेइंग इलेव्हन
शुभमन गिल, अभिषेक शर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, शिवम दुबे, जितेश शर्मा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती
ऑस्ट्रेलियाची प्लेइंग इलेव्हन
मिचेल मार्श, मॅथ्यू शॉर्ट, जॉश इंग्लिस, टीम डेव्हिड, जॉश फिलीप, मार्कस स्टॉयनिस, ग्लेन मॅक्सवेल, बेन ड्वारशुईस, झेवियर बार्टलेट, नॅथन एलिस, ऍडम झम्पा
