पहिला सामना पावसामुळे रद्द झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाने दुसरा तर भारताने तिसऱ्या सामन्यात विजय मिळवला, त्यामुळे 5 टी-20 मॅचची ही सीरिज 1-1 ने बरोबरीमध्ये आहे. या सामन्यासाठी भारत आणि ऑस्ट्रेलियाने टीममध्ये बदल केले. भारताने कुलदीप यादवला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टेस्ट सीरिजची तयारी करण्यासाठी भारतात पाठवलं आहे. तर ऑस्ट्रेलियानेही ऍशेससाठी ट्रॅविस हेडला शेफिल्ड शील्ड खेळण्यासाठी पाठवलं आहे. तर दुसऱ्या टी-20 मध्ये धमाकेदार कामगिरी करणाऱ्या फास्ट बॉलर जॉश हेजलवूडलाही ऑस्ट्रेलियाने विश्रांती दिली आहे. याशिवाय ग्लेन मॅक्सवेलचंही ऑस्ट्रेलियाच्या टीममध्ये कमबॅक झालं आहे.
advertisement
चौथ्या टी-20 साठी भारतीय टीम
शुभमन गिल, अभिषेक शर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, शिवम दुबे, जितेश शर्मा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती
ऑस्ट्रेलियाची प्लेइंग इलेव्हन
मिचेल मार्श, मॅथ्यू शॉर्ट, जॉश इंग्लिस, टीम डेव्हिड, जॉश फिलीप, मार्कस स्टॉयनिस, ग्लेन मॅक्सवेल, बेन ड्वारशुईस, झेवियर बार्टलेट, नॅथन एलिस, ऍडम झम्पा
