अभिषेक शर्माची विकेट गेल्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर शिवम दुबेला पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला, पण हा निर्णयही अपयशी ठरला. 18 बॉलमध्ये 22 रन करून दुबे आऊट झाला. यानंतर सूर्यकुमार यादव 20, तिलक वर्मा 5, जितेश शर्मा 3 रनवर आऊट झाले. अक्षर पटेलने 11 बॉलमध्ये नाबाद 21 रन केल्यामुळे भारताला या स्कोअरपर्यंत मजल मारता आली.
advertisement
ऑस्ट्रेलियाकडून नॅथन एलिस आणि ऍडम झम्पाला प्रत्येकी 3-3 विकेट मिळाल्या, तर झेवियर बार्टलेट आणि मार्कस स्टॉयनिस यांना 1-1 विकेट घेण्यात यश आलं.
ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकला
या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मिचेल मार्शने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला. टीम इंडियाने त्यांच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल केलेला नाही, तर ऑस्ट्रेलियाच्या टीममध्ये चार बदल आहेत. 5 टी-20 मॅचच्या या सीरिजची पहिली मॅच पावसामुळे रद्द झाली तर दुसरा सामना ऑस्ट्रेलियाने आणि तिसरा सामना भारताने जिंकला. चौथ्या टी-20 मध्ये विजय मिळवणारी टीम सीरिजमध्ये हरू शकणार नाही.
