ऑस्ट्रेलियाकडून ओपनर मिचेल मार्शने 30 आणि मॅथ्यू शॉर्टने 25 रनची खेळी केली. यानंतर मात्र ऑस्ट्रेलियाची बॅटिंग गडगडली. त्याआधी भारताने 20 ओव्हरमध्ये 8 विकेट गमावून 167 रन केले. शुभमन गिलने 46, अभिषेक शर्माने 28 रन केले. तर शिवम दुबेने 22 आणि सूर्यकुमार यादवने 20 रनची खेळी केली. अक्षर पटेलने 11 बॉलमध्ये नाबाद 21 रन करून टीमला सन्मानजनक स्कोअरपर्यंत पोहोचवलं. बॅटिंग आणि बॉलिंगमध्ये केलेल्या या उत्कृष्ट कामगिरीबद्दल अक्षर पटेलला प्लेअर ऑफ द मॅच देऊन गौरवण्यात आलं.
advertisement
काय म्हणाला सूर्यकुमार यादव?
टीम इंडियाच्या या विजयाचे शिल्पकार वॉशिंग्टन सुंदर आणि अक्षर पटेल आहेत, पण कर्णधार सूर्यकुमार यादवने या विजयाचं श्रेय शुभमन गिल आणि अभिषेक शर्माला दिलं. 'या विजयाचं श्रेय बॅटिंगला जातं, खासकरून अभिषेक आणि शुभमन. पॉवरप्लेमध्ये दोघांनी स्मार्ट सुरूवात करून दिली. ही 200 प्लसची खेळपट्टी नसल्याचं त्यांच्या लगेच लक्षात आलं. प्रत्येकाने स्कोअर केला. ड्रेसिंग रूममधून पाठवलेले संदेश स्पष्ट होते. मी आणि गौती भाई एकाच पानावर आहोत', असं सूर्यकुमार यादव म्हणाला.
'दव पडत असताना बॉलरनही लगेच परिस्थिती जाणून घेत त्यानुसार बदल केले. त्यांनी उत्कृष्ट बॉलिंग केली. दोन-तीन ओव्हर टाकणारे बॉलर असतील, तर चांगलंच आहे, पण हे परिस्थितीवर अवलंबून आहे. कधी वॉशिंग्टन चार ओव्हर टाकतो, तर कधी शिवम. ही लवचिकता आमच्यासाठी प्रभावी ठरते. टीमला काय हवं आहे, हे जाणून घेऊन ते करण्यासाठी प्रत्येक जण तयार असतो', असं म्हणत सूर्याने खेळाडूंचं कौतुक केलं आहे.
