TRENDING:

3 ते 4 लाख उत्पन्न देणारा बिजल्या, शेतकऱ्याने 11 लाखांना का विकला?

Last Updated:

पवन राठोड यांचा बिजल्या नावाचा बैल तब्बल 11 लाख 11 हजार रुपयांना विक्री झाला. केवळ पंधरा महिने केलेल्या योग्य प्रशिक्षण, रखरखाव आणि खुराकाच्या बळावर बिजल्या तयार झाला.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
जालना : जालना जिल्ह्यातील एका शेतकऱ्याला बैलाने लखपती बनवले आहे. पवन राठोड यांचा बिजल्या नावाचा बैल तब्बल 11 लाख 11 हजार रुपयांना विक्री झाला. केवळ पंधरा महिने केलेल्या योग्य प्रशिक्षण, रखरखाव आणि खुराकाच्या बळावर बिजल्या तयार झाला. घोड्यापेक्षा जास्त वेगाने पळणाऱ्या बिजल्या बैलाला यामुळेच बिजल्या हे नाव ठेवण्यात आले. आतापर्यंत या बैलाने 30 शर्यतीत सहभाग नोंदवला. यापैकी 25 शर्यतीत प्रथम क्रमांक पटकावला. जालना, जिंतूर, परभणी आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शर्यतीत त्याने बाजी मारली आहे.
advertisement

केवळ 10 महिन्यांचा असताना या बैलाला केवळ 51 हजार रुपयात तामिळनाडूतून खरेदी केले होते. घोड्यालाही घाम फोडवणारी ताकद असल्याचे बोलले जात होते. बिजल्या हा शंकरपटातील बैल असल्यामुळे त्याचे मूल्य अधिक होते. त्याची उंची, ताकद आणि तालमेळ पाहून त्याला उच्च किंमत दिली जात होती. अखेर सांगली जिल्ह्यातील कटरेवाडी येथील सागर कटरे यांनी हा बैल 11 लाख 11 हजार रुपयांना खरेदी केला. या विक्रीमुळे पवन राठोड यांचे आर्थिक जीवनच बदलले असून, ते एका दिवसात लखपती झाले आहेत.

advertisement

पुणे ते मिरज प्रवास सुपरफास्ट होणार, रेल्वेचा मोठा टप्पा पूर्ण, प्रवाशांना होणार फायदा

बैलावर प्रेम, नियमित प्रशिक्षण आणि काळजी घेतल्यामुळेच बिजल्या इतका मौल्यवान झाला. मेहनत आणि चिकाटीने एखाद्या प्राणी किंवा शेतीतील उत्पादनातून मोठा लाभ मिळवता येतो. बिजल्याच्या विक्रीमुळे मंठा तालुक्यातील शेतकरी आणि प्राणीपालकांत उत्सुकता निर्माण झाली आहे, असे पवन राठोड यांनी सांगितले.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
आले दर तेजीत, गुळ आणि शेवग्याला आज काय मिळाला भाव? Video
सर्व पहा

15 महिन्यांत त्याला आहारात रोज 3 लिटर दूध, 100 ग्रॅम बदाम, 1 किलो उडीद डाळ, सायंकाळी मका आणि गहू भरडा दिला जातो. दर दोन दिवसांनी त्याची गरम पाण्याने अंघोळ घालून निगा राखली जाते. बिजल्याने 30 पैकी 25 शर्यती जिंकल्या. शंकरपटात शर्यतीत घोड्यांसोबत भाग घेतला आणि पहिले स्थान पटकावले. जालना, वाशिम, जिंतूर, परभणी, छत्रपती संभाजीनगर येथील 30 पैकी 25 शर्यतींमध्ये त्यांनी प्रथम क्रमांक मिळवला असून 3 ते 4 लाख रुपये कमाई केली आहे.

advertisement

मराठी बातम्या/कृषी/
3 ते 4 लाख उत्पन्न देणारा बिजल्या, शेतकऱ्याने 11 लाखांना का विकला?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल