शुभमन गिलचं टीम इंडियामध्ये कमबॅक झाल्यानंतर त्याला उपकर्णधारही करण्यात आलं. एवढंच नाही तर त्याच्यासाठी टीम इंडियाच्या बॅटिंग ऑर्डरमध्येही बदल केले गेले, पण या निर्णयाचा ना टीम इंडियाला फायदा झाला, ना शुभमन गिलला. उलट टीमची बॅटिंग ऑर्डर बदलल्यामुळे भारताच्या पाच खेळाडूंचं करिअरच पणाला लागलं आहे.
शुभमन गिलचं टीममध्ये कमबॅक झाल्यानंतर संजू सॅमसनला त्याची ओपनिंगची जागा खाली करावी लागली, यानंतर संजू आशिया कपमध्ये मिडल ऑर्डरमध्ये खेळला, पण खालच्या क्रमांकावर यश येत नसल्यामुळे संजूला ऑस्ट्रेलियाविरुद्ध प्लेइंग इलेव्हनमधूनच बाहेर केलं गेलं.
advertisement
यशस्वी जयस्वालने टेस्ट क्रिकेट आणि आयपीएलमध्ये धमाकेदार कामगिरी केली आहे, पण त्यालाही ओपनरची जागा फिक्स असल्यामुळे भारताच्या टी-20 टीममध्ये संधी मिळत नाहीये. शुभमन गिलच्या ओपनिंगसाठी टीम इंडियाने तिलक वर्मा आणि सूर्यकुमार यादव यालाही तिसऱ्या क्रमांकावर बॅटिंगला पाठवून बघितलं, पण यात त्यांनाही यश आलं नाही. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या टी-20 सामन्यात अखेर शिवम दुबेला तिसऱ्या क्रमांकावर बॅटिंगची संधी मिळाली. खरंतर शिवम दुबेची टीममधली भूमिका ही फिनिशरची आहे, पण तिसऱ्या क्रमांकाची अडचण दूर करण्यासाठी दुबेला तिसऱ्या क्रमांकावर बॅटिंगला पाठवलं गेलं, पण तोही 22 रन करून आऊट झाला.
