तिसऱ्या टी-20 सामन्यात अर्शदीप सिंग आणि वॉशिंग्टन सुंदर या दोघांना संधी मिळाली, आणि या दोघांनीच भारताला मॅच जिंकवून देण्यात मोलाची भूमिका बजावली, त्यामुळे अर्शदीप आणि सुंदरला डावलल्यावरून गंभीर चाहत्यांच्या टार्गेटवर आला.
आता चौथ्या टी-20 सामन्यातही भारताने त्यांच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणतेही बदल केलेले नाहीत. फास्ट बॉलर हर्षित राणाला पुन्हा एकदा बेंचवर बसावं लागलं आहे, तर नितीश कुमार रेड्डीही फिट झाला आहे, पण त्यालाही संधी देण्यात आलेली नाही. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टी-20 मॅचआधी नितीश कुमार रेड्डीला दुखापत झाली होती, त्यामुळे तो पहिल्या तीन सामन्यांमधून बाहेर झाला होता, पण चौथ्या मॅचच्या एक दिवस आधीच रेड्डी फिट झाल्याचं टीम मॅनेजमेंटकडून सांगितलं गेलं.
advertisement
टी-20 फॉरमॅटमध्ये जास्त ऑलराऊंडर खेळवण्यावर प्रशिक्षक गौतम गंभीरचा भर असतो, त्यामुळे शिवम दुबेसह, नितीश रेड्डीलाही संधी द्यायचा गंभीरचा आग्रह असतो. याशिवाय नितीश राणा आठव्या-नवव्या क्रमांकावर चांगली बॅटिंग करू शकतो, त्यामुळे त्यालाही संधी दिली जाते. पण ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात गंभीरला नितीश कुमार रेड्डी आणि हर्षित राणाला बाहेर ठेवावं लागलं आहे.
भारताची प्लेइंग इलेव्हन
अभिषेक शर्मा, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, जितेश शर्मा, शिवम दुबे, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह
