Team india vs Australia 4th T20 : चौथ्या टी20 सामन्यात भारताने 48 धावांनी ऑस्ट्रेलियाचा पराभव केला आहे. हा सामना ऑस्ट्रेलिया सहज जिंकू शकला असता. कारण फारशा धावा नव्हत्या आणि ऑस्ट्रेलियाच्या हातात विकेटही होते. मात्र वॉशिग्टंन सुंदरच्या खतरनाक गोलंदाजीने अख्खी मॅच फिरली आणि टीम इंडियाने हा सामना जिंकला आहे.
advertisement
टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना 167 धावा ठोकल्या होत्या.त्यामुळे ऑस्ट्रेलियासमोर 168 धावांचे लक्ष्य होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची सूरूवात चांगली झाली होती. ऑस्ट्रेलियाकडून सलामीवीर मिचेर मार्शने 30 आणि मॅथ्यू शॉर्टने 25 धावांची खेळी करून डावाला चांगली सूरूवात केली होती. त्यानतंर जोश इंग्लीश 12 वर बाद झाला. त्याच्या पाठोपाठ टीम डेविड 14,जोश फिलिप 10 धावांवर बाद झाला.हे खेळाडू बाद होऊन देखील ऑस्ट्रेलिया सहज सामना जिंकेल अशी परिस्थिती होती.
17 वी ओव्हर निर्णायक ठरली
या दरम्यान कॅप्टन सूर्यकुमार यादवने वॉशिंग्टन सुंदरकडे बॉल दिला आणि अख्खी मॅच फिरली. मार्क स्टॉयनिस चांगल्या लयीत खेळत होता. स्टॉयनिस शेवटपर्यंत खेळपट्टीवर राहिला असता तर त्याने ऑस्ट्रेलियाला सहज विजय मिळवून दिला असता. त्यामुळे त्याला बाद करण्यासाठी कर्णधार सूर्यकुमार यादवने अष्टपैलू खेळाडू वॉश्गिंटन सुंदरच्या हातात बॉल सोपवला. वॉश्गिंटन सुंदरने देखील सूर्याला अजिबात निराश केले नाही. पहिल्या तीन बॉलवर केवळ दोन रन्स निघाल्याने ऑस्ट्रेलियन खेळाडू दडपणात आले. त्यामुळे मोठा फटका मारण्याच्या नादात स्टॉयनिस पायचित (एलबीडब्ल्यू) आऊट झाला. त्यानंतर मोठ्या फटकेबाजीसाठी प्रसिद्ध असणारा झेव्हियर बाटलेट फलंदाजीसाठी मैदानात आला. त्याला पहिला बॉलवरच वॉश्गिंटनने बाद केले. अगदी सरळ रेषेत साईड स्क्रीनकडे मारण्याच्या प्रयत्नात झेव्हियरने वॉश्गिंटनकडे कॅच दिला. एकाच षटकात ऑस्ट्रेलियाच्या दोन प्रमुख विकेट गेल्याने ऑस्ट्रेलियाचा विजय भारताने खेचून घेतला. वॉश्गिंटनला बोलिंग देण्याची सूर्याची शक्कल कामी आली
यानंतर भारताला विजयासाठी दोन विकेट आवश्यक होत्या.त्यावेळी बुमराहने बेनला 5 धावांवर बाद केले. नंतर शेवटचा विकेट अॅडम जम्पाला वॉशिंग्टनने बाद केले.अशाप्रकारे ऑस्ट्रेलियाचा डाव 119 धावांवर ऑल आऊट झाला. अशाप्रकारे भारताने हा सामना 48 धावांनी जिंकला.भारताकडून वॉशिंग्टन सुंदरने 3,शिवम दुबे अक्षर पटेलने प्रत्येकी 2 आणि अर्शदिप सिंह, जसप्रीत बुमराह आणि वरुन चक्रवर्तीने प्रत्येकी 1 विकेट घेतली.
भारताकडून शुभमन गिले 46 धावांची सर्वाधिक खेळी केली पण तो या सामन्यात टेस्ट सारखा खेळला. त्याच्यासोबत अभिषेकच्या 28 धावा आणि शेवटच्या क्षणी अक्षर पटेलच्या 21 धावांच्या बळावर भारताने 8 विकेट गमावून 167 धावा केल्या होत्या. यावेळी ऑस्ट्रेलियाकडून अॅडम झम्पा आणि नॅथन इलिसने प्रत्येकी 3 विकेट झेवियर बार्टलेट आणि स्टॉईनिसने प्रत्येकी 1 विकेट घेतली.
