ब्रिस्बेनमध्ये वीजेच्या कडकडाटासह वादळ आणि पावसाचा अलर्ट आल्यामुळे सामना थांबवला गेला. तसंच स्टेडियममध्ये उपस्थित असलेल्या प्रेक्षकांनाही सुरक्षित स्थळी जायला सांगण्यात आलं. यानंतर पुढच्या काही मिनिटांमध्ये मुसळधार पावसाला सुरूवात झाली. पाऊस थांबत नसल्यामुळे अखेर सामना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.
या सीरिजमधला पहिला सामनाही पावसामुळे रद्द झाला होता, तर दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा विजय झाला. तिसऱ्या आणि चौथ्या टी-20 मध्ये भारताने जोरदार पुनरागमन करत विजय मिळवला आणि सीरिजमध्ये 2-1 ने आघाडी घेतली. पाचवी मॅचही पावसाने रद्द झाल्यामुळे भारताने आणखी एका टी-20 सीरिजमध्ये विजय मिळवला आहे. ऑस्ट्रेलिया दौरा संपल्यानंतर आता टीम इंडियाचे खेळाडू भारतात परतणार आहेत. 14 नोव्हेंबरपासून दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 2 टेस्ट मॅचच्या सीरिजला सुरूवात होणार आहे, त्यानंतर दोन्ही टीममध्ये 3 वनडे आणि 5 टी-20 मॅचची सीरिज होईल.
advertisement
