शुभमन गिलचा संघर्ष
आशिया कपपासून शुभमन गिलचं भारताच्या टी-20 टीममध्ये पुनरागमन झालं, पण त्यानंतरच्या एकाही टी-20 सामन्यात त्याला अर्धशतक करता आलं नाही. गिलला आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यात शेवटचं अर्धशतक करून वर्षभरापेक्षा जास्त काळ झाला आहे. तसंच ओपनर असलेला गिल पॉवर प्लेमध्ये ज्या स्ट्राईक रेटने बॅटिंग करतो, त्यामुळेही टीमची चिंता वाढण्याची शक्यता आहे.
advertisement
तिलक वर्माला डच्चू
या संपूर्ण सीरिजमध्ये तिलक वर्माची बॅट शांत राहिली, त्यामुळे पाचव्या टी-20 सामन्यासाठी त्याला बाहेर ठेवण्यात आलं. मागच्या काही काळापासून तिलक वर्माला वेगवेगळ्या क्रमांकावर बॅटिंग करावी लागली आहे, याचा फटकाही त्याला बसला आहे. शुभमन गिलचं टीममध्ये कमबॅक झाल्यानंतर भारताच्या मिडल ऑर्डरमध्ये बरेच बदल करावे लागले आहेत.
सूर्यकुमार यादवची बॅटही शांत
मागच्या काही काळापासून सूर्यकुमार यादवचा फॉर्मही टीम इंडियासाठी चिंतेचा विषय बनला आहे. तिलकप्रमाणेच सूर्यकुमार यादवलाही त्याचा बॅटिंग क्रमांक बदलावा लागला. कधी तो तिसऱ्या तर कधी चौथ्या क्रमांकावर बॅटिंगला आला, पण कोणत्याच क्रमांकावर त्याला धमाकेदार कामगिरी करता आली नाही.
संजूचा रोल काय?
गिलचं कमबॅक झाल्यानंतर तो ओपनिंगला खेळायला लागला, त्यामुळे संजू सॅमसनला मिडल ऑर्डरमध्ये खेळावं लागलं, पण या क्रमांकावर संजूलाही संघर्ष करावा लागला आहे, त्यामुळे संजूलाही त्याचं टीममधलं स्थान गमवावं लागलं आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध विकेट कीपर म्हणून जितेश शर्माला खेळण्याची संधी मिळाली.
हार्दिकचा कमबॅक, बाहेर कोण?
आशिया कपवेळी हार्दिक पांड्याला दुखापत झाली होती, त्यामुळे तो ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 सीरिजमध्ये खेळू शकला नाही, पण हार्दिक पांड्याचं कमबॅक झाल्यानंतर कोणत्या खेळाडूला बाहेर बसावं लागणार? याचा कठोर निर्णय सूर्यकुमार यादव आणि गौतम गंभीरला घ्यावा लागणार आहे.
