TRENDING:

IND vs AUS : गाबाचा घमंड पुन्हा तुटणार! पाचव्या T20 मध्ये कुणाला चान्स? सूर्या Playing XI बदलणार!

Last Updated:

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या 5 टी-20 मॅचच्या सीरिजचा शेवटचा सामना शनिवारी ब्रिस्बेनच्या गाबामध्ये होणार आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या 5 टी-20 मॅचच्या सीरिजचा शेवटचा सामना शनिवारी ब्रिस्बेनच्या गाबामध्ये होणार आहे. चौथ्या टी-20 सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव केल्यानंतर भारताने सीरिजमध्ये 2-1 ने आघाडी घेतली आहे. पाचवा सामना पावसामुळे रद्द झाला तर टीम इंडिया सीरिजही जिंकेल. सीरिजमधले दोन सामने जिंकले असले, तरी काही बॅटरचा फॉर्म कर्णधार सूर्यकुमार यादवसाठी चिंतेचा विषय आहे.
गाबाचा घमंड पुन्हा तुटणार! पाचव्या T20 मध्ये कुणाला चान्स? सूर्या Playing XI बदलणार!
गाबाचा घमंड पुन्हा तुटणार! पाचव्या T20 मध्ये कुणाला चान्स? सूर्या Playing XI बदलणार!
advertisement

तिलक वर्माला या सीरिजमध्ये उल्लेखनीय कामगिरी करता आली नाही. आशिया कपमध्ये तिलक चांगल्या फॉर्ममध्ये होता, पण या सीरिजमध्ये त्याला प्रभाव पाडता आलेला नाही. तसंच तिलकच्या बॅटिंग ऑर्डरवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे, कारण तिसऱ्या क्रमांकावर शिवम दुबे आणि चौथ्या नंबरवर सूर्यकुमार यादवला बॅटिंगसाठी पाठवण्यात आलं आहे. पहिली मॅच सोडली तर सूर्यादेखील तीनही सामन्यांमध्ये फ्लॉप ठरला, 4 इनिंगमध्ये त्याला 84 रन करता आल्या आहेत. तर शुभमन गिललाही त्याची छाप सोडता आलेली नाही.

advertisement

प्लेइंग इलेव्हनमध्ये कुणाला संधी?

तिलक वर्मा सीरिजच्या शेवटच्या सामन्यात फॉर्ममध्ये यायचा प्रयत्न करेल. शिवम दुबेला बॅटने मोठा स्कोअर करता आला नसला, तरी तो बॉलिंगमध्ये गेम चेंजर ठरला. मागच्या सामन्यात दुबेने मिचेल मार्श आणि टीम डेव्हिडची विकेट घेतली. कर्णधार सूर्यकुमार यादव आणि कोच गौतम गंभीरला प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल करायचे असतील तर बॅटिंगमध्ये संजू सॅमसन, नितीश कुमार रेड्डी आणि रिंकू सिंगचा पर्याय उपलब्ध आहे.

advertisement

भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन

अभिषेक शर्मा, शुभमन गिल, शिवम दुबे, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, जितेश शर्मा, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह

कशी असणार खेळपट्टी?

गाबाच्या खेळपट्टीवर बाऊन्स असण्याची शक्यता आहे, त्यामुळे फास्ट बॉलरना मदत मिळेल. तर स्पिनरना मात्र लाईन आणि लेंथमध्ये बदल करून बॉलिंग करावी लागेल. या मैदानात पहिले बॅटिंग करणाऱ्या टीमचं रेकॉर्ड चांगलं आहे. गाबामध्ये झालेल्या 11 टी-20 सामन्यांपैकी 8 मॅचमध्ये पहिले बॅटिंग करणारी टीम जिंकली आहे. या मैदानात पहिल्या इनिंगचा सरासरी स्कोअर 159 आहे, तर दुसऱ्या इनिंगचा सरासरी स्कोअर 138 रन आहे.

advertisement

ब्रिस्बेनमध्ये पावसाचा अंदाज

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या पाचव्या टी-20 सामन्यात पावसाचा अंदाज आहे. हवामान खात्याने शनिवारी रात्री पावसाची 50 टक्के शक्यता वर्तवली आहे. पावसामुळे मॅच रद्द झाली तर मात्र टीम इंडिया ही सीरिज 2-1 ने जिंकेल.

कुठे पाहता येणार सामना?

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, सोयाबीनच्या दराबद्दल नवी अपडेट, आज काय मिळाला भाव?
सर्व पहा

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातली पाचवी टी-20 मॅच भारतीय वेळेनुसार दुपारी 1.45 वाजता सुरू होणार आहे, तर टॉस दुपारी 1.15 वाजता होईल. मॅचचं प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्सवर होईल, तर लाईव्ह स्ट्रीमिंग जियो हॉटस्टारचं ऍप आणि साईटवर पाहायला मिळेल.

advertisement

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs AUS : गाबाचा घमंड पुन्हा तुटणार! पाचव्या T20 मध्ये कुणाला चान्स? सूर्या Playing XI बदलणार!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल