Abhishek Sharma Record : ब्रिस्बेनच्या गाबा स्टेडिअमवर सुरू असलेला भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पाचवा टी20 सामना रद्द करण्यात आला आहे.त्यामुळे भारताने 2-1ने ही मालिका जिंकली आहे. या सामन्यात टीम इंडियाचा सलामीवर अभिषेक शर्माने मोठा रेकॉर्ड केला आहे. अभिषेकने टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक 1000 धावा करण्याचा रेकॉर्ड करून इतिहास रचला आहे. कारण आतापर्यंत टी20 क्रिकेटमध्ये कुणालाच अशी कामगिरी जमली नाही आहे, ती अभिषेकने करून दाखवली आहे.
advertisement
खरं तर ऑस्ट्रेलियन कर्णधार मिचेल मार्शने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे टीम इंडिया प्रथम फलंदाजीला उतरली होती. यावेळी शुभमन गिल आणि अभिषेक शर्मा यांनी भारतीय संघाला धमाकेदार सुरुवात करून दिली होती. या दरम्यान अभिषेक शर्माने टी20 क्रिकेटमध्ये 1000 धावा पूर्ण केल्या होत्या. विशेष म्हणजे टी 20 क्रिकेटमध्ये आतापर्यंत 1600 खेळाडूंचा डेब्यू झाला आहे. या खेळाडूंना जे जमलं नाही ते अभिषेकने करून दाखवले.
1000 धावा करण्यासाठी सर्वात कमी डाव
27- विराट कोहली
28- अभिषेक शर्मा
29- केएल राहुल
31- सूर्यकुमार यादव
40- रोहित शर्मा
बॉलच्या बाबतीत अभिषेक शर्मा टी2 मध्ये 1000 धावा पूर्ण करणारा सर्वात जलद फलंदाज बनला आहे. अभिषेकने 1000 धावा पूर्ण करण्यासाठी 528 चेंडू घेतले. अभिषेकने भारताचा टी20 कर्णधार सूर्यकुमार यादवचा विक्रम मोडला. सूर्यकुमारने 573 चेंडूत 1000 धावा केल्या. शिवाय, डावांच्या बाबतीत अभिषेक हा 1000 टी20
बॉलद्वारे सर्वात जलद 1000 टी-20 धावा
528- अभिषेक शर्मा (भारत)
573- सूर्यकुमार यादव (भारत)
599 - फिल साल्ट (इंग्लंड)
604 - ग्लेन मॅक्सवेल (ऑस्ट्रेलिया)
609 - आंद्रे रसेल (वेस्ट इंडिज)/फिन अॅलन (न्यूझीलंड)
दरम्यान पाचव्या टी20 सामन्यात भारत 5 ओव्हरमध्ये 52 धावा करून एकही विकेट गमावला नव्हता. पण पावसामुळे हा सामना थांबवण्यात आला होता. पण पाऊस थांबायचं नाव घेत नसल्याने आता हा सामना रद्द करण्यात आला आहे.त्यामुळे ही मालिका भारताने 2-1 ने खिशात घातली आहे.
गाब्बा टी20 साठी भारताचा प्लेइंग इलेव्हन: अभिषेक शर्मा, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव (कर्णधार), रिंकू सिंग, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, शिवम दुबे, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह.
गाब्बा टी20 साठी ऑस्ट्रेलियाचा प्लेइंग इलेव्हन: मिचेल मार्श (कर्णधार), मॅथ्यू शॉर्ट, जोश इंग्लिस (यष्टीरक्षक), टिम डेव्हिड, जोश फिलिप, मार्कस स्टोइनिस, ग्लेन मॅक्सवेल, बेन द्वारशुइस, झेवियर बार्टलेट, नॅथन एलिस आणि अॅडम झम्पा
