दोघांना रंगेहात अटक
ऑनलाईन तिकीट खरेदी केलेल्यांना बारकोड दाखवून सिविल लाईन्सविषयी येथून तिकिटाची हार्ड कॉपी घ्यायची असते. त्यासाठी सोमवारपासूनच क्रिकेट प्रेमींच्या रांगा लागल्या आहेत. अशातच दोघंही आरोपी याच परिसरात जास्त दराने तिकीट विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली, त्यानंतर दोघांनाही रंगेहात अटक करण्यात आली. पोलीस या प्रकरणात अधिकची कारवाई करत आहेत.
advertisement
अवघ्या काही मिनिटातच तिकिटे विक्री
रविवारी सकाळी 10 वाजतापासून भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या सामन्याची ऑनलाईन तिकिट विक्रीला सुरुवात झाली आणि अवघ्या काही मिनिटातच संपूर्ण तिकिटे विकली गेली. त्यामुळे ऑफलाईन पद्धतीने तिकीट घेण्यासाठी चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. व्हीसीएने प्रत्येक व्यक्तीला तिकिटविक्रीसाठी दोन तिकिटांची मर्यादा घातली असल्याने मोठी गर्दी दिसून आली होती. यंदाही शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी तसेच अनाथ मुलांसाठी व्हीसीएमार्फत तिकिट उपलब्ध करून देण्यात आले.
6 फेब्रुवारी दुपारी दीड वाजल्यापासून...
दरम्यान, भारत विरुद्ध इंग्लंड सामना 6 फेब्रुवारी दुपारी दीड वाजल्यापासून व्हीसीएच्या जामठा मैदानावर खेळविला जाईल. या मैदानाची क्षंमता सुमारे 44 हजार लोकांची आहे. या मैदानावर अंतिम सामना 2019 मध्ये ऑस्ट्रेलिया संघाविरोधात खेळविण्यात आला होता. त्यानंतर एकही वनडे सामना या स्टेडियमवर खेळवला गेला नव्हता.
