विकेट घेतल्यानंतर आकाश दीप बन डकेटच्या जवळ गेला आणि त्याने डकेटच्या खांद्यावर हात ठेवला. यानंतर आकाश दीप डकेटला काहीतरी बोलला, त्यावर डकेटनेही प्रतिक्रिया दिली. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे.
advertisement
38 बॉलमध्ये 43 रन करून बेन डकेट आऊट झाला, त्याच्यात आणि झॅक क्रॉली यांच्यामध्ये 92 रनची ओपनिंग पार्टनरशीप झाली. डकेट आणि क्रॉली यांनी पहिल्या ओव्हरपासूनच भारतीय बॉलरवर आक्रमण केलं. त्याआधी दुसऱ्या दिवसाच्या सुरूवातीला पहिल्या अर्ध्या तासातच टीम इंडियाचा ऑल आऊट झाला. दिवसाची सुरूवात 204/6 अशी करणाऱ्या टीम इंडियाचा डाव 224 रनवर आटोपला. 34 बॉलमध्येच भारताने त्यांच्या शेवटच्या 4 विकेट गमावल्या.
इंग्लंडकडून सीरिजमधली पहिलीच टेस्ट खेळणाऱ्या गस अटकिनसनला 5 विकेट मिळाल्या, तर जॉश टंगने 3 आणि क्रिस वोक्सने 1 विकेट घेतली. भारताकडून करुण नायरने सर्वाधिक 57 रनची खेळी केली. तर साई सुदर्शनने 38 आणि वॉशिंग्टन सुंदरने 26 रन केले. 5 टेस्ट मॅचच्या या सीरिजमध्ये टीम इंडिया 2-1 ने पिछाडीवर आहे. सीरिज ड्रॉ करण्यासाठी टीम इंडियाला हा सामना जिंकावा लागणार आहे. हा सामना अनिर्णित राहिला किंवा इंग्लंडने जिंकला तर टीम इंडिया ही सीरिजही गमावेल.