प्रसिद्ध कृष्णा याने बॉलिंग करत असताना इंग्लंडचा ओपनर झॅक क्रॉलीच्या दिशेने बॉल फेकला, हा बॉल झॅक क्रॉलीच्या बॅटला लागला, त्यानंतर कुमार धर्मसेना यांनी प्रसिद्ध कृष्णाला समज दिली. काही वेळानंतर प्रसिद्ध कृष्णा यानेच झॅक क्रॉलीची विकेट घेतली. झॅक क्रॉली आऊट झाल्यानंतर मैदानात आलेल्या जो रूटसोबतही प्रसिद्ध कृष्णाचे वाद झाले. यानंतर जो रूट संतापला, तेव्हा अंपायर कुमार धर्मसेना मध्ये पडले. या वादामध्ये मग केएल राहुलनेही उडी घेतली.
advertisement
धर्मसेना-राहुलमध्ये वाद
अंपायर कुमार धर्मसेना आणि केएल राहुल यांच्यात झालेला वाद स्टम्प माईकमध्ये कैद झाला आहे. 'आम्ही नेमकं काय करावं असं तुम्हाला वाटतंय? शांत बसायचं?' असं केएल राहुलने कुमार धर्मसेनाला विचारलं. त्यावर एखादा बॉलर तुझ्या अंगावर धावून आला, तर तुला आवडेल का? असा प्रश्न कुमार धर्मसेना यांनी राहुलला विचारला. तू असं करू शकत नाहीस, नाही राहुल, आपण त्या मार्गाने जाऊ शकत नाही, असा समजही धर्मसेना यांनी राहुलला दिला. त्यावर राहुलनेही मग आम्ही फक्त बॅटिंग आणि बॉलिंग करून घरी जायचं का? असा प्रश्न विचारला. याबद्दल आपण मॅचनंतर चर्चा करू, तू असं बोलू शकत नाहीस, असं उत्तर कुमार धर्मसेना यांनी राहुलला दिलं.
डकेट-आकाश दीपही भिडले
दरम्यान इंग्लंडचा ओपनर बेन डकेट आणि भारताचा फास्ट बॉलर आकाश दीप यांच्यातही वाद झाले. तू माझी विकेट घेऊ शकत नाहीस, असं चॅलेंज बेन डकेटने आकाश दीपला दिलं होतं, यानंतर आकाश दीपनेच डकेटची विकेट घेतली. डकेटला आऊट केल्यानंतर आकाश दीपने त्याच्या खांद्यावर हात ठेवला, त्यानंतरही दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाली.