IND vs ENG : खांद्यावर हात टाकून पॅव्हेलियनमध्ये सोडलं, आकाश दीपने वचपा काढला, भारत-इंग्लंड सामन्यात पुन्हा राडा, Video

Last Updated:

इंग्लंडचा ओपनर बेन डकेट याची विकेट घेतल्यानंतर टीम इंडियाचा फास्ट बॉलर आकाश दीप याने हटके सेलिब्रेशन केलं आहे.

खांद्यावर हात टाकून पॅव्हेलियनमध्ये सोडलं, आकाश दीपने वचपा काढला, भारत-इंग्लंड सामन्यात पुन्हा राडा, Video
खांद्यावर हात टाकून पॅव्हेलियनमध्ये सोडलं, आकाश दीपने वचपा काढला, भारत-इंग्लंड सामन्यात पुन्हा राडा, Video
लंडन : इंग्लंडचा ओपनर बेन डकेट याची विकेट घेतल्यानंतर टीम इंडियाचा फास्ट बॉलर आकाश दीप याने हटके सेलिब्रेशन केलं आहे. आकाश दीप याच्या या सेलिब्रेशनचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आकाश दीपच्या बॉलिंगवर बेन डकेटने रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न केला, पण या नादात त्याने विकेट कीपर ध्रुव जुरेलकडे कॅच दिला.
विकेट घेतल्यानंतर आकाश दीप बन डकेटच्या जवळ गेला आणि त्याने डकेटच्या खांद्यावर हात ठेवला. यानंतर आकाश दीप डकेटला काहीतरी बोलला, त्यावर डकेटनेही प्रतिक्रिया दिली. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे.
advertisement
38 बॉलमध्ये 43 रन करून बेन डकेट आऊट झाला, त्याच्यात आणि झॅक क्रॉली यांच्यामध्ये 92 रनची ओपनिंग पार्टनरशीप झाली. डकेट आणि क्रॉली यांनी पहिल्या ओव्हरपासूनच भारतीय बॉलरवर आक्रमण केलं. त्याआधी दुसऱ्या दिवसाच्या सुरूवातीला पहिल्या अर्ध्या तासातच टीम इंडियाचा ऑल आऊट झाला. दिवसाची सुरूवात 204/6 अशी करणाऱ्या टीम इंडियाचा डाव 224 रनवर आटोपला. 34 बॉलमध्येच भारताने त्यांच्या शेवटच्या 4 विकेट गमावल्या.
advertisement
इंग्लंडकडून सीरिजमधली पहिलीच टेस्ट खेळणाऱ्या गस अटकिनसनला 5 विकेट मिळाल्या, तर जॉश टंगने 3 आणि क्रिस वोक्सने 1 विकेट घेतली. भारताकडून करुण नायरने सर्वाधिक 57 रनची खेळी केली. तर साई सुदर्शनने 38 आणि वॉशिंग्टन सुंदरने 26 रन केले. 5 टेस्ट मॅचच्या या सीरिजमध्ये टीम इंडिया 2-1 ने पिछाडीवर आहे. सीरिज ड्रॉ करण्यासाठी टीम इंडियाला हा सामना जिंकावा लागणार आहे. हा सामना अनिर्णित राहिला किंवा इंग्लंडने जिंकला तर टीम इंडिया ही सीरिजही गमावेल.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs ENG : खांद्यावर हात टाकून पॅव्हेलियनमध्ये सोडलं, आकाश दीपने वचपा काढला, भारत-इंग्लंड सामन्यात पुन्हा राडा, Video
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement