गिलने मेसेज करून बोलावलं
एजबॅस्टन कसोटीपूर्वी पंजाब किंग्जचा डावखुरा स्पिन बॉलर हरप्रीत ब्रार टीम इंडियाच्या सराव सत्रात दिसला होता. हरप्रीत भारतीय टेस्ट टीमचा भाग नाही, पण त्याने नेटमध्ये भारतीय बॅटरना बॉलिंग केली. हरप्रीत ब्रारने आता खुलासा केला आहे की तो कुणाच्या सांगण्यावरून टीम इंडियाच्या सराव सत्राचा भाग झाला. कर्णधार शुभमन गिलचा मेसेज आल्यानंतर आपण बर्मिंघममध्ये असलेल्या टीम इंडियामध्ये सामील झाल्याचं हरप्रीत ब्रारने सांगितलं आहे.
advertisement
'माझ्या पत्नीचे घर स्विंडनमध्ये आहे, जे बर्मिंगहॅमपासून दीड तासाच्या अंतरावर आहे. मी शुभमनशी बोलत होतो आणि त्याने मला मेसेज पाठवला. मी विचार केला, चला तिथे सराव करूया. हा एक वेगळा अनुभव आहे, असे वाटते की आपण आपल्या कुटुंबात आहोत', असं हरप्रीत ब्रार बीसीसीआयने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये म्हणाला आहे. यासोबतच हरप्रीत ब्रारने पंजाबकडून खेळणाऱ्या अर्शदीप सिंगचेही कौतुक केले.
पहिल्या सामन्यात बॉलर्सकडून निराशा
टीम इंडियाने लीड्समधील हेडिंग्ले येथे झालेला पहिला सामना पाच विकेट्सने गमावला. शेवटच्या इनिंगमध्ये इंग्लंडने 371 रनचे लक्ष्य सहज गाठले. या पराभवामुळे भारतीय बॉलिंगवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं, विशेषतः रवींद्र जडेजासारख्या स्पिन बॉलरच्या कामगिरीवर, ज्याने संपूर्ण सामन्यात फक्त एकच विकेट घेतली. जसप्रीत बुमराहने पहिल्या डावात पाच विकेट घेतल्या, पण दुसऱ्या डावात तो प्रभाव पाडू शकला नाही. उर्वरित फास्ट बॉलरही अपयशी ठरले आणि सात कॅच सोडण्याच्या चुकीमुळे टीम इंडियाचा पराभव झाला.
