नेमकं काय म्हणाला हॅरी ब्रुक?
पहिल्या इनिंगमध्ये आम्हाला काहीसा बॉल टर्न होईल, अशी अपेक्षा होती. पण तसं काहीही झालं नाही. होय मी माझे दोन्ही हात वर करून माझी चूक मान्य करतो की, मी संजूचा कॅच घ्यायला हवा होता. संजूचा कॅच सोडून माझ्याकडून मोठी चूक झाली, असं हॅरी ब्रुक म्हणाला. त्यावेळी त्याचा आवाज कातरल्यासारखा दिसत होता. त्याचा कंठ देखील दाटून आला होता. आपल्या चुकीमुळे आपण वर्ल्ड कपमधून बाहेर गेल्याचं दु:ख त्याच्या चेहऱ्यावर दिसत होतं. आम्ही चांगली फिल्डिंग केली नाही. खासकडून जगातील सर्वोत्तम बॅटिंग लाईनअपविरुद्घ आम्ही फिल्डिंगवर फोकस करायला हवा होता, असंही हॅरी ब्रुक म्हणाला.
advertisement
तिसऱ्या ओव्हरच्या दुसऱ्या बॉलवर काय घडलं?
टीम इंडियाची बॅटिंग सुरू असताना अभिषेक शर्माने माती खाल्ली अन् दुसऱ्याच ओव्हरमध्ये टीम इंडियाला धक्का बसला. अभिषेक शर्मा आऊट झाल्यानंतर टीम इंडियावर आणखी एक संकट आलं असतं. तिसरी ओव्हर घेऊन पुन्हा जोफ्रा आर्चर आला. जोफ्राने संजूला टार्गेट केलं. तिसऱ्या ओव्हरच्या दुसऱ्या बॉलवर आर्चरने संजूला एक पुल शॉट खेळण्याची संधी दिली पण संजूने बॉल मिड ऑनच्या दिशेने उचलला. इथंच संजूने घोडचूक केली.
संजूने कानाला खडा लावला
संजूने फिल्डरच्या दिशेने बॉल हवेच उचलला होता, त्यामुळे इंग्लंडकडे मोठी संधी हाती घावली. पण स्वत: कॅप्टनने इथं मोठी मिस्टेक केली. हॅरी ब्रुकने संजू सॅमसनचा कॅच सोडला. त्यावेळी संजू फक्त 15 धावांवर खेळत होता. संजूने त्यानंतर कानाला खडा लावला अन् अशी चूक पुन्हा केली नाही. संजूने 89 धावांची आक्रमक खेळी केली. त्याने साधसुधं नाही तर 211.90 च्या स्ट्राईक रेटने अशा धावा केल्या आहेत. त्यामुळे त्याला प्लेयर ऑफ मॅचचा अवॉर्ड देखील देण्यात आला.
