खरं तर टी20 वर्ल्ड कप आधी अभिषेक शर्माला सर्वात मोठा मॅचविनर आणि धोकादायक खेळाडू म्हणून पाहिले जात होते. पण वर्ल्ड कपमध्ये हा खेळाडू पूर्णपणे फ्लॉप ठरला आहे. कारण युएसविरूद्ध पहिल्या सामन्यात अभिषेक शर्मा डकवर बाद झाला होता.त्यानंतर नामिबिया विरूद्ध सामन्याआधी अभिषेकच पोट बिघडल्यामुळे त्याला सामन्यात विश्रांती देण्यात आली होती. त्यानंतर पाकिस्तान विरूद्ध तो पुन्हा मैदानात आला. पण पाकिस्तानविरूद्ध देखील तो शुन्यावर बाद झाला.
advertisement
त्यानंतर आजच्या सामन्यात देखील नामिबिया विरूद्ध तो शुन्यावर बाद झाला आहे. खरं तर आजच्या सामन्यात मैदानात फलंदाजीला उतरण्यापूर्वी त्याने पहिल्यांदा अर्शदिपची जर्सी घातली.पण अर्शदिप प्लेइंग इलेव्हनमध्ये असल्याने ती काढून मोहम्मद सिराजची काढली.अशाप्रकारे त्याने नशीब आजमावण्याचा प्रयत्न केला.पण तो पुन्हा शुन्यावर बाद झाला आहे. वर्ल्डकप मध्ये तिसऱ्यांदा असं झालंय की अभिषेक शर्मा शुन्यावर बाद झाला आहे.
दरम्यान अभिषेक शर्माने आता भारतासाठी एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक (5) वेळा डकवर आऊट झाला आहे. 2024 मध्ये संजू सॅमसन देखील इतक्याच वेळ बाद झाला होता.
टी20 मध्ये एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक डक (6) करणारे सलामीवीर
सैम अयुब (पाकिस्तान, 2025)
5 - चालोएमवोंग चटफाईसन (थायलंड, 2024)
5 - कुशल भुर्तेल (नेपाळ, 2024)
5 - धर्मा केसुमा (इंडोनेशिया, 2025)
5 - परवेझ हुसेन इमोन (बांगलादेश, 2025)
5 - अभिषेक शर्मा (भारत, 2026)
