खरं तर टीम इंडियाने त्यांचे ग्रुप स्टेजमधील दोन सामने भारतात खेळले होते. आणि पाकिस्तानविरूद्ध सामन्यासाठी त्यांना कोलंबोला जावे लागले होते.जिकडे भारताने पाकिस्तानचा 61 धावांनी पराभव केला होता. या विजयासाठी भारताने सूपर 8 गाठलं होतं. दरम्यान या सामन्यासाठी सूर्यकुमार यादवने चायनामॅन कुलदीप यादवला संघात घेतलं होतं. कारण कोलंबोचं मैदान फिरकीसाठी अनुकूल होतं. त्यामुळे सूर्यकुमार यादवला कुलदीपला संघात घेणं गरजेच होतं.त्यामुळे त्याने अर्शदिपला बाहेर बसवून कुलदीपला पाकिस्तान विरूद्ध संधी दिली होती.
advertisement
आता कोलंबोवरून भारतीय टीम अहमदाबादला उतरली आहे.भारताला आता ग्रुप स्टेजमधला शेवटचा सामना हा नेदरलँड विरूद्ध नरेंद्र मोदी स्टेडिअमवर खेळावा लागणार आहे. त्यामुळे सूपर 8 आधी म्हणजेच नेदरलँड विरूद्ध सामन्यासाठी सूर्यकुमार यादव पुन्हा आपला हुकमी एक्का अर्शदिपला पुन्हा संघात घेणार आहे. त्यामुळे अर्शदिप संघात आल्याने कुलदीप यादव संघातून बाहेर होण्याची शक्यता आहे.
दरम्यान याव्यतिरीक्त कोणताही बदल टीम इंडियात होणार नसल्याची माहिती आहे. तसेट नेदरलँड विरूद्ध सामन्यात टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल होणार नसल्याचे सीतांशू कोटक यांनी सामन्याच्या आधी झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले आहे.
खेळापूर्वी आम्ही जे काही निर्णय घेतले, आम्ही आक्रमक पण हुशार क्रिकेट खेळलो. इशानने खूप चांगली खेळी केली आणि नंतर सूर्या, तिलक, शिवम ते चांगले खेळले आहेत, असे सितांशु कोटक यांनी पाकिस्ताविरूद्ध सामन्याच्या निकालावर सांगितले.
