मनं तोडावी लागली तर मला फरक पडणार नाही - सँटनर
सँटनरने पुढे म्हटले की, न्यूझीलंड गेल्या काही टूर्नामेंट्समध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करत आहे. फायनलमध्ये मैदानावर उपस्थित असलेल्या हजारो भारतीय चाहत्यांना शांत करणं हं आमचे मुख्य ध्येय असेल. जर ट्रॉफी जिंकण्यासाठी मला एकदा काहीजणांची मन तोडावी लागली तर मला फरक पडणार नाही, असं वक्तव्य सँटनरने केलं आहे. घरच्या मैदानावर खेळत असल्याने टीम इंडियावर विजयाचा मोठा दबाव असेल, ज्याचा फायदा घेण्याचा कीवी संघ प्रयत्न करेल, असंही तो म्हणाला.
advertisement
वरुण हा एक उत्तम बॉलर
वरुण चक्रवर्तीच्या सध्याच्या खराब फॉर्मवर बोलताना सँटनरने त्याची पाठराखण केली. तो म्हणाला की, "वरुण हा एक उत्तम बॉलर आहे आणि तो फॉर्ममध्ये परतण्यापासून केवळ एक मॅच लांब आहे." जरी सध्या हे पीच सपाट दिसत असले तरी, वरुणसारखा खेळाडू कधीही पुनरागमन करू शकतो याची न्यूझीलंडला कल्पना आहे. त्यामुळे कीवी बॅट्समन वरुणला हलक्यात घेण्याची चूक करणार नाहीत.
विजेतेपदाचे स्वप्न रोखण्यासाठी सज्ज
दरम्यान, रविवारी होणाऱ्या या फायनलमध्ये न्यूझीलंडचा संघ भारताचे विजेतेपदाचे स्वप्न रोखण्यासाठी सज्ज झाला आहे. सँटनरच्या मते, मैदानातील शांतता हीच त्यांच्या यशाची पावती असेल. आता 8 मार्च रोजी होणाऱ्या या महामुकाबल्यात भारतीय फॅन्सना शांत करण्यात कीवी संघ यशस्वी होतो की सूर्यकुमारची सेना बाजी मारते, हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.
