व्हायरल व्हिडिओमध्ये सामन्यानंतर गौतम गंभीर, केएल राहुल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, नितीश कुमार रेड्डी, हर्षित राणा असे सगळेच खेळाडू उभे आहेत. या दरम्यान स्टेडिअममधून काही फॅन्स गौतम गंभीर 'हाय हाय'चे नारे देतात. हे नारे पाहून सगळेच मागे वळून पाहतात. त्यानंतर सगळे पुन्हा चाहत्यांना दुर्लक्षित करतात.
विशेष म्हणजे यानंतर विराट कोहलीने हातवारे करून चाहत्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे जिकडे गंभीर विरोधात घोषणाबाजी सूरू होती तिकडे कुणीच चाहत्यांना शांत करायचा प्रयत्न केला नाही, त्यानंतर विराट कोहलीने धाडस दाखवून चाहत्यांना घरं केलं होतं. या संदर्भाला व्हिडिओ देखील समोर आली आहे.
दरम्यान हा व्हिडिओ फेक असल्याच देखील बोललं जात आहे. कारण मागच्या वेळेस देखील अशाचप्रकारे गौतम गंभीर विरोधात मैदानात घोषणाबाजी झाली होती.असे बोलले जात आहे की,मागच्या व्हिडिओतला वॉईस ओव्हर या व्हिडिओला लावून हा व्हिडिओ शेअर केल्याचे बोलले जात आहे.
भारत विरूद्ध न्यूझीलंड टी20 मालिकेचे वेळापत्रक
पहिला टी20 सामना : 21 जानेवारी 2026, नागपूर संध्याकाळी 7.00 वाजता
दुसरा टी20 सामना : 23 जानेवारी 2026, रायपूर संध्याकाळी 7.00 वाजता
तिसरा टी20 सामना : 25 जानेवारी 2026, गुवाहाटी, संध्याकाळी 7.00 वाजता
चौथा टी20 सामना : 28 जानेवारी 2026, विशाखापट्टणम,संध्याकाळी 7.00 वाजता
पाचवा टी20 सामना : 31 जानेवारी 2026, तिरूवनंतपुरम, संध्याकाळी 7.00 वाजता
