कपाशीच्या दरात किंचित घट
कृषी मार्केट वेबसाईटवरील सायंकाळी 6.30 वाजताच्या रिपोर्टनुसार, आज राज्यातील कृषी मार्केटमध्ये कपाशीची एकूण 15 हजार 770 क्विंटल इतकी आवक झाली. यामध्ये वर्धा मार्केटमध्ये 5 हजार 900 क्विंटल कपाशीची सर्वाधिक आवक नोंदवण्यात आली. वर्धा मार्केटमध्ये कपाशीला कमीत कमी 7 हजार 675 ते जास्तीत जास्त 8 हजार 275 रुपये प्रतिक्विंटल असा बाजारभाव मिळाला. विशेष म्हणजे, वर्धा मार्केटमध्ये आलेल्या लांब स्टेपल कपाशीला 8 हजार 290 रुपये प्रतिक्विंटल असा सर्वाधिक दर मिळाला. मात्र, सोमवारी मिळालेल्या सर्वाधिक दराच्या तुलनेत आज कपाशीच्या दरात किंचित घट झाल्याचे चित्र आहे.
advertisement
Recipe Video: आंबट गोड आवळ्याचा मुरांबा कसा बनवायचा? ठरेल आरोग्यासाठी गुणकारी; पाहा रेसिपी
कांद्याच्या दरात पुन्हा वाढ
आज राज्यातील कृषी मार्केटमध्ये कांद्याची एकूण 2 लाख 60 हजार 972 क्विंटल इतकी मोठी आवक झाली. यामध्ये नाशिक मार्केटमध्ये 1 लाख 19 हजार 070 क्विंटल लाल कांद्याची सर्वाधिक आवक झाली. नाशिक बाजारात कांद्याला कमीत कमी 513 ते जास्तीत जास्त 1 हजार 649 रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. दरम्यान, अमरावती मार्केटमध्ये आवक झालेल्या लाल कांद्याला 2 हजार 800 रुपये प्रतिक्विंटल असा सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे. सोमवारी मिळालेल्या कांद्याच्या दरांच्या तुलनेत आज कांद्याच्या सर्वाधिक दरात किंचित वाढ नोंदवण्यात आली आहे.
सोयाबीनचे दर वाढीवर
राज्यात आज सोयाबीनची एकूण 42 हजार 100 क्विंटल इतकी आवक झाली. वाशिम मार्केटमध्ये 7 हजार क्विंटल सोयाबीनची सर्वाधिक आवक नोंदवण्यात आली. वाशिम बाजारात सोयाबीनला कमीत कमी 4 हजार 820 ते जास्तीत जास्त 5 हजार 350 रुपये प्रतिक्विंटल असा बाजारभाव मिळाला. तसेच, वाशिम मार्केटमध्ये आलेल्या पिवळ्या सोयाबीनला 6 हजार 300 रुपये प्रतिक्विंटल असा सर्वाधिक दर मिळाल्याचे चित्र आहे. सोमवारी मिळालेल्या दरांच्या तुलनेत आज सोयाबीनच्या दरात वाढ झाली आहे.
तुरीच्या दरात आजही वाढ कायम
आज राज्यातील कृषी मार्केटमध्ये तुरीची एकूण 37 हजार 077 क्विंटल इतकी आवक झाली. यामध्ये जालना मार्केटमध्ये 12 हजार 768 क्विंटल पांढऱ्या तुरीची सर्वाधिक आवक नोंदवण्यात आली. जालना बाजारात तुरीला 6 हजार 250 ते 7 हजार 288 रुपये प्रतिक्विंटल असा बाजारभाव मिळाला. दरम्यान, सोलापूर मार्केटमध्ये आलेल्या काळ्या तुरीला 9 हजार रुपये प्रतिक्विंटल असा सर्वाधिक दर मिळाला आहे. सोमवारी मिळालेल्या दरांच्या तुलनेत आज तुरीच्या सर्वाधिक दरात वाढ नोंदवली गेली आहे.





