Recipe Video: आंबट गोड आवळ्याचा मुरांबा कसा बनवायचा? ठरेल आरोग्यासाठी गुणकारी; पाहा रेसिपी

Last Updated:

हिवाळ्याच्या दिवसांत मुळातच आवळा खाणे पौष्टिक असते. त्यामुळे अनेकजण आपल्या घरी आवळ्याचे अनेक पदार्थ बनवत असतात. त्यापैकीच म्हणजेच आवळ्याचा मुरांबा. त्याची आज रेसिपी जाणून घेऊया...

+
आवळ्याचा

आवळ्याचा मोरावळा/मुरंबा 

मुंबई: थंडीच्या दिवसांत बाजारांमध्ये ताजे, आंबटगोड आवळे अगदी मोठ्या प्रमाणांत विकायला असतात. हिवाळ्याच्या दिवसांत मुळातच आवळा खाणे पौष्टिक आणि पाचक असते. ऐन कडाक्याच्या थंडीत प्रत्येक घरी आवळ्याचे वेगवेगळे चविष्ट पदार्थ तयार केले जातात. आवळ्याची चटणी, आवळा कडी, आवळा सुपारी, आवळा ज्यूस असे अनेक झटपट होणारे पदार्थ तयार केले जातात. परंतु काही पदार्थ असे असतात की जे हिवाळ्यात एकदाच तयार करून वर्षभरासाठी स्टोअर केले जातात त्यापैकीच 'आवळ्याचा मोरावळा' हा एक खास पदार्थ. आज आपण आवळ्याचा मोरावळा म्हणजेच मुरंबा कसा बनवायचा साहित्य आणि कृती बघणार आहोत.
साहित्य (१ किलो आवळ्यांसाठी)
  • आवळे: १ किलो
  • साखर किंवा गूळ: १ किलो (आवळ्याप्रमाणे)
  • तूप: १-२ चमचे
  • वेलची: ४-५ (ठेचलेली)लवंग: ४-५
  • दालचिनी: १ इंच (ऐच्छिक)
  • मीठ: चिमूटभर
कृती
  • आवळा स्वच्छ धुवून घ्या.
  • प्रत्येक आवळ्याला सुरीने किंवा काट्याने २-३ ठिकाणी टोचे मारा (त्यामुळे पाक आतपर्यंत जातो).
  • एका मोठ्या भांड्यात पाणी उकळून त्यावर चाळणी ठेवून आवळे १० मिनिटे वाफवून घ्या किंवा टोचलेले आवळे उकळत्या पाण्यात ५ मिनिटे ठेवा. (यामुळे आवळे कडू लागत नाहीत आणि पौष्टिक तत्व टिकतात).
  • एका जाड बुडाच्या पातेल्यात साखर/गूळ आणि अर्धा कप पाणी घ्या. त्याला एकतारी पाक येईपर्यंत उकळा.
  • पाकात वेलची, लवंग, दालचिनी आणि चिमूटभर मीठ टाका.
  • आता वाफवलेले आवळे पाकात टाका आणि ५-७ मिनिटे मंद आचेवर शिजू द्या.
  • शेवटी १ चमचा तूप घालून मिक्स करा.
  • आता आवळे पूर्णपणे थंड होऊ द्या.
advertisement
साठवणूक- पूर्ण थंड झाल्यावर मोरावळा काचेच्या बरणीत भरा. हा मोरावळा फ्रिजशिवाय वर्षभर टिकतो आणि आरोग्यासाठी खूप पौष्टिक असतो.
टीप- आवळे उकडताना किंवा वाफवताना जास्त शिजवू नका, ते फक्त थोडे मऊ झाले पाहिजेत. गूळ वापरल्यास मोरावळ्याचा रंग गडद होतो आणि चवही छान लागते.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/रेसिपी/
Recipe Video: आंबट गोड आवळ्याचा मुरांबा कसा बनवायचा? ठरेल आरोग्यासाठी गुणकारी; पाहा रेसिपी
Next Article
advertisement
BMC Election Results MIM : बीएमसीमध्ये ८ जागा जिंकल्यानंतर एमआयएमला मोठा जॅकपॉट, मुंबईच्या सत्ता समीकरणात उलटफेर
बीएमसीमध्ये ८ जागा जिंकल्यानंतर एमआयएमला मोठा जॅकपॉट, मुंबईच्या सत्ता समीकरणात उ
  • मुंबई महापालिकेची सत्ता भाजप-महायुतीने हिसकावली आहे.

  • एमआयएमने लक्षणीय कामगिरी करत मुंबईत ८ जागांवर विजय मिळवला.

  • मुंबईतील निवडणुकीतील या यशानंतर आता एमआयएमला मोठा जॅकपॉट लागला आहे.

View All
advertisement