पाकिस्तान विरूद्ध फायनल सामन्यात सुर्यकुमार यादवने रिंकु सिंहला संधी दिली आहे.रिंकू सिंह हा तोच खेळाडू आहे ज्याला आशिया कप 2025 च्या कोणत्याच सामन्यात खेळायची संधी मिळाली नव्हती. पण आज फायनल सामन्यात रिंकुला खेळायची संधी मिळाली आहे.त्यामुळे आता रिंकु सिंह या संधीचं सोनं करतो का? हे पाहावे लागणार आहे.
टीम इंडियाला मोठा झटका
advertisement
हार्दिक पांड्या दुखापतीमुळे या सामन्यात खेळत नाहीये. हार्दिक पांड्याला श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यामध्येच दुखापत झाली होती. शिवम दुबे आणि रिंकू सिंग याचं टीम इंडियात कमबॅक झालं आहे, तर हर्षीत राणा आणि अर्शदीप सिंगला बाहेर बसावं लागलं आहे.त्यामुळे हार्दिक पांड्या संघात नसल्याने टीम इंडियाचा धक्का बसला आहे.
भारताची प्लेइंग इलेव्हन :
अभिषेक शर्मा, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव(कर्णधार), तिलक वर्मा, संजू सॅमसन(विकेटकिपर), शिवम दुबे, रिंकू सिंग, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती
पाकिस्तान (प्लेइंग इलेव्हन):
साहिबजादा फरहान, फखर जमान, सैम अयुब, सलमान आगा (कर्णधार), हुसैन तलत, मोहम्मद हरिस (विकेटकिपर), मोहम्मद नवाज, फहीम अश्रफ, शाहीन आफ्रिदी, हरिस रौफ, अबरार अहमद