TRENDING:

IND vs PAK : 9.27 ते 9.30...3 मिनिटात अख्खी मॅच फिरली, हायव्होल्टेज सामन्यात काय घडलं?पाहा VIDEO

Last Updated:

विशेष म्हणजे सामन्यातील ती तीन मिनिटं टर्निंग पॉईंट ठरली आहे. कारण या तीन मिनिटातच संपूर्ण मॅच पलटली आहे.त्यामुळे या तीन मिनिटात काय काय घडलं? हे जाणून घेऊयात.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Kuldeep Yadav Over : फायनल सामन्यात पाकिस्तान टीम इंडियासमोर धावांचा डोंगर उभं करेल असे त्यांच्या सुरूवातीच्या आक्रामक खेळीनंतर वाटत असताना तीन मिनिटात मॅच फिरली आहे. टीम इंडियाच्या गोलंदाजांनी ही मॅच फिरवली आहे. त्यामुळे पाकिस्तान अवघ्या 146 धावांवर ऑल आऊट झाली आहे.भारताकडून कुलदीप यादवने 4, बुमराह,चक्रवर्ती आणि अक्षर पटेलने प्रत्येकी 2-2 विकेट घेतल्या आहेत. त्यामुळे ही मॅच 3 मिनिटात कशी फिरली हे जाणून घेऊयात.
kuldeep yadav wickets
kuldeep yadav wickets
advertisement

पण टीम इंडियाच्या गोलंदाजांनी भेदक गोलंदाजी करून सामन्यात वापसी केली आहे. विशेष म्हणजे सामन्यातील ती तीन मिनिटं टर्निंग पॉईंट ठरली आहे. कारण या तीन मिनिटातच संपूर्ण मॅच पलटली आहे.त्यामुळे या तीन मिनिटात काय काय घडलं? हे जाणून घेऊयात.

खरं तर टीम इंडियाचा स्पिनर गोलंदाज अक्षर पटेलची 9.26 ला 16 वी ओव्हर आटोपली होती.त्यानंतर चायनामॅन कुलदीप यादपव 17 वी ओव्हर टाकायला मैदानात आला होता. यावेळी त्याने या एकाच ओव्हरमध्ये तीन विकेट घेतल्या होत्या. पाकिस्तानच्या सलमान आगाला सुरूवातीला त्याने बाद केले. त्यानंतर दुसरा बॉल डॉट झाला. तिसऱ्या बॉल व्हाईट त्यानंतर पुन्हा तिसऱ्या बॉलवर नो रन, चौथ्या बॉलवर कुलदीप यादवने शाहिन आफ्रीदिला आऊट केले. पाचव्या बॉलवर पुन्हा एकही धावा नाही.तर शेवटच्या बॉलवर फहीमला बाद केले.अशाप्रकारे कुलदीप यादवने या ओव्हरमध्ये तीन विकेट काढल्या होत्या. ही त्याची मेडन ओव्हर देखील होती.ही ओव्हर 9.30 ला संपली होती.त्यामुळे या तीन मिनिटात अख्खी मॅच पालटली होती.

advertisement

advertisement

कुलदीप यादव ओव्हर

पहिला बॉल : सलमान आगा बाद

दुसरा बॉल : डॉट

तिसरा बॉल : व्हाईट

तिसरा बॉल : डॉट

चौथा बॉल :शाहिन आफ्रीदि आऊट

पाचवा बॉल : डॉट

सहावा बॉल: फहीम बाद

भारताची प्लेइंग इलेव्हन :

अभिषेक शर्मा, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव(कर्णधार), तिलक वर्मा, संजू सॅमसन(विकेटकिपर), शिवम दुबे, रिंकू सिंग, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती

advertisement

पाकिस्तान (प्लेइंग इलेव्हन):

साहिबजादा फरहान, फखर जमान, सैम अयुब, सलमान आगा (कर्णधार), हुसैन तलत, मोहम्मद हरिस (विकेटकिपर), मोहम्मद नवाज, फहीम अश्रफ, शाहीन आफ्रिदी, हरिस रौफ, अबरार अहमद

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs PAK : 9.27 ते 9.30...3 मिनिटात अख्खी मॅच फिरली, हायव्होल्टेज सामन्यात काय घडलं?पाहा VIDEO
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल