खरं तर फायनल सामन्यापूर्वी पाकिस्तानी कर्णधार सलमान अली आगा याची पत्रकार परिषद पार पडली आहे. या पत्रकार परिषदेत एका पत्रकाराने सलमान आगाला विचारले की, तु्म्ही खेळाडूंना त्यांच्या आक्रामक वर्तनावर नियंत्रण ठेवण्यासाठी काही सल्ला दिला आहात का? यावर सलमान आगा म्हणाला, भारताविरुद्धच्या आशिया कपच्या अंतिम सामन्यात खेळाडूंना आक्रामक वर्तनावर नियंत्रण ठेवण्यापासून अजिबात रोखणार नाही. जोपर्यंत तो अनादर वाटत नाही,असे आगाने स्पष्ट सांगितले आहे.
advertisement
आगा पुढे म्हणाला, प्रत्येकाला त्यांच्या भावना व्यक्त करण्याचा अधिकार आहे. जर आपण वेगवान गोलंदाजांना आक्रामक होण्यापासू रोखले तर काय उरेल? पण जिथपर्यंत अनादर वाटत नाही तिथपर्यंत मी कोणालाही रोखणार नाही,असे आगाने स्पष्ट सांगितले आहे.मी 2007 मध्ये 16 वर्षांखालील क्रिकेट खेळायला सुरुवात केली.मी कधीही कोणत्याही संघाला हस्तांदोलन करण्यापासून टाळताना पाहिले नाही.सध्याच्या परिस्थितीपेक्षा वाईट परिस्थिती असताना देखील भारत आणि पाकिस्तानमध्ये हस्तांदोलन केले गेले नसल्याचे कधीच घडले नाही.
विशेष म्हणजे सलमान अली आगाने यावेळी पाकिस्तानने भारताविरूद्ध याआधीचे दोन सामने का गमावले? यामागचं कारणही सांगितले आहे.भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात नेहमीच दबाव असतो.आम्ही गेल्या दोन सामन्यात जास्त चुका केल्यामुळे हरलो,असे आगाने सांगून टाकले.
भारताचा संपूर्ण संघ: सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, शिवम दुबे, हार्दिक पंड्या, जितेश शर्मा (यष्टिरक्षक), अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, संजू सॅमसन (यष्टिरक्षक), रिंकू सिंग आणि हर्षित राणा.
पाकिस्तानचा पूर्ण संघ: साहिबजादा फरहान, फखर जमान, सलमान अली आगा (कर्णधार), अबरार अहमद, फहीम अश्रफ, हारिस रौफ, हसन अली, हसन नवाज, हुसैन तलत, खुशदिल शाह, मोहम्मद हारिस (यष्टीरक्षक), मोहम्मद नवाज, मोहम्मद वसीम ज्युनियर, सैम अयुब, सलमान शाह, सुईम शाह, मुहम्मद अयुब, मुहम्मद शाहफ्रिअन.