या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला. यानंतर पाकिस्तानचे दोन्ही ओपनर साहिबजादा फरहान आणि फखर झमान यांनी धमाकेदार सुरूवात केली. फरहान आणि फखर झमान यांच्यात 9.4 ओव्हरमध्ये 84 रनची पार्टनरशीप झाली, पण त्यानंतर पाकिस्तानची बॅटिंग पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळली. कुलदीप यादवने 4 ओव्हरमध्ये 30 रन देऊन 4 विकेट घेतल्या. यातल्या 3 विकेट कुलदीपने एका ओव्हरमध्येच घेतल्या. तर अक्षर पटेलने 4 ओव्हरमध्ये 26 रन देऊन 2 विकेट मिळाल्या. तर वरुण चक्रवर्तीनेही 4 ओव्हरमध्ये 30 रन देऊन पाकिस्तानला 2 धक्के दिले. जसप्रीत बुमराहने डेथ ओव्हरमध्ये 2 विकेट घेऊन पाकिस्तानला ऑल आऊट केलं.
advertisement
पाकिस्तानकडून साहिबजादा फरहानने सर्वाधिक 57 रन केले. फरहानच्या या खेळीमध्ये 5 फोर आणि 3 सिक्सचा समावेश होता. तर फखर झमानने 35 बॉलमध्ये 46 रन केले. फखर झमानने त्याच्या इनिंगमध्ये 2 फोर आणि 2 सिक्स लगावल्या.