पाकिस्तानने तब्बल 8 वेळा बाजी मारली
कोणत्याही आंतरराष्ट्रीय स्पर्धेत किंवा ट्रँग्युलर सीरीजच्या फायनलमध्ये हे दोन्ही संघ 12 व्या वेळेस एकमेकांसमोर उभे ठाकले होते. फायनल मॅचमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आकडेवारी भारतासाठी चिंता वाढवणारी आहे. यापूर्वी झालेल्या 12 फायनल मॅचमध्ये पाकिस्तानने तब्बल 8 वेळा बाजी मारली आहे, तर भारताला केवळ 4 वेळाच विजय मिळवता आला आहे. त्यामुळे आता टीम इंडिया हा रेकॉर्ड सुधारणार का? असा सवाल विचारला जातोय.
advertisement
18 वर्षांचा रेकॉर्ड टीम इंडिया मोडणार?
भारताने पाकिस्तानविरुद्धचा आपला शेवटचा खिताबी विजय 2007 च्या टी-ट्वेंटी वर्ल्ड कपामध्ये मिळवला होता. त्या ऐतिहासिक मॅचमध्ये भारताने थरारक विजय मिळवून पहिला टी-ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकला होता. या 2007 नंतर, दोन्ही संघ शेवटच्या वेळेस 2017 मध्ये आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलसाठी आमनेसामने आले होते. मात्र, त्यावेळीही पाकिस्ताननेच मॅच जिंकून भारताला पराभवाचा धक्का दिला होता.
दुष्काळ संपवण्याची सुवर्णसंधी
आजचा सामना भारतीय संघासाठी केवळ एक मॅच नाही, तर 8-4 असा असलेला हा पराभवाचा इतिहास बदलण्याची आणि 2007 नंतर पाकिस्तानविरुद्धचा फायनलमधील विजयाचा दुष्काळ संपवण्याची ही सुवर्णसंधी आहे.