यंदाच्या आशिया कपमध्ये सूर्यकुमार यादवला संघर्ष करावा लागला आहे. या स्पर्धेत सूर्यकुमार यादवचा स्कोअर 7 नाबाद, 47 नाबाद, 0, 5, 12 आणि 1 असा आहे. संपूर्ण स्पर्धेत सूर्यकुमार यादवला फक्त 72 रनच करता आल्या. सुरूवातीच्या 2 विकेट लवकर गेल्यामुळे टीम इंडिया अडचणीत सापडली.
सूर्याचा पाकिस्तानविरुद्ध संघर्ष
सूर्यकुमार यादवची पाकिस्तानविरुद्ध टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यातली कामगिरीही निराशाजनक झाली आहे. पाकिस्तानविरुद्ध 8 इनिंगमध्ये सूर्यकुमारने फक्त 16 ची सरासरी आणि 113.13 च्या स्ट्राईक रेटने 112 रन केल्या. तर 2025 मध्ये सूर्याने 11 इनिंगमध्ये 11.11 ची सरासरी आणि 105.26 च्या स्ट्राईक रेटने 100 रन केले आहेत. टी-20 स्पर्धेच्या फायनलमध्येही सूर्याची आतापर्यंतची कामगिरी निराशाजनक झाली आहे. आतापर्यंत सूर्या लीग आणि आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या 8 फायनल खेळला, ज्यात त्याने फक्त 14.37 च्या सरासरीने आणि 108.49 च्या स्ट्राईक रेटने 115 रन केले आहेत.
advertisement
वर्ल्ड कपआधी टीम इंडियाचं टेन्शन
2026 साली होणारा टी-20 वर्ल्ड कप हा भारतामध्ये होणार आहे. या वर्ल्ड कपआधी भारतीय टीम जास्तीत जास्त 15 टी-20 खेळणार आहे, पण त्याआधी सूर्यकुमार यादवचा हा फॉर्म तसंच त्याचं मोठ्या स्पर्धांच्या फायनलमधलं रेकॉर्ड टीम इंडियाचं टेन्शन वाढवणारं आहे.