खरं तर आशिया कपच्या प्रत्येक सामन्याच्या आदल्या दिवशी संघाच्या पत्रकार परिषदा पार पडतात.पण भारताने फायनल पुर्वी पत्रकार परिषद पार पडली. तर पाकिस्तान मात्र पत्रकार परिषद देऊन मोकळा झाला आहे. तसेच फायनल सामना म्हटलं तर सामन्याच्या आदल्या दिवशी दोन्ही संघाच्या कर्णधारांचे फोटोशुट होते. पण भारताने हे फोटोशूट करण्यास मनाई केली असल्याची माहिती क्रिकेट सुत्रांकडून मिळते. सध्याचे भारत-पाकिस्तान संबंध पाहता, ट्रॉफीसह कोणतेही फोटोशूट झाले नाही.त्यामुळे फायनलच्या उत्साहात असलेल्या पाकिस्तानला मोठा झटका बसला आहे.
advertisement
भारतीय संघाने अंतिम सामन्याच्या आदल्या दिवशी 27 सप्टेंबर रोजी सराव केला नाही. याचे मुख्य कारण म्हणजे खेळाडूंना आलेला थकवा दूर करण्यासाठी सराव टाळण्यात आला होता. श्रीलंकेविरूद्धचा सामना देखील सुपर ओव्हरमध्ये गेला होता.पण अंतिम सामन्यापूर्वी खेळाडूंना ताजेतवाने ठेवण्यासाठी संघ व्यवस्थापनाने हा निर्णय घेतला. याव्यतिरिक्त, भारतीय संघ सामन्यापूर्वी पत्रकार परिषद घेतली नाही.
भारतीय खेळाडू हॉटेलमध्ये विश्रांती आणि रणनीतीवर लक्ष केंद्रित करत आहेत. खेळाडूंना मानसिकदृष्ट्या तयार आणि ताजेतवाने ठेवण्यासाठी, अंतिम सामन्यात त्यांचे लक्ष आणि कामगिरी उच्च पातळीवर राहावी यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. श्रीलंकेविरुद्धच्या सुपर फोर सामन्यानंतर भारतीय खेळाडूंसाठी विश्रांती महत्त्वाची होती.
दुसरीकडे, पाकिस्तानी संघाची पत्रकार परिषद भारतीय वेळेनुसार सायंकाळी ७:३० वाजता झाली आहे. पाकिस्तानी संघाने २५ सप्टेंबर रोजी बांगलादेशविरुद्ध शेवटचा सामना खेळला होता. त्यामुळे खेळाडूंना पुरेशी विश्रांती मिळाली आहे.पाकिस्तानी खेळाडू नेट प्रॅक्टिसवर लक्ष केंद्रित करत आहेत आणि मागील सामन्यांमध्ये झालेल्या चुकांमधून शिकण्याचा प्रयत्न करत आहेत.
भारताचा संपूर्ण संघ: सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, शिवम दुबे, हार्दिक पंड्या, जितेश शर्मा (यष्टिरक्षक), अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, संजू सॅमसन (यष्टिरक्षक), रिंकू सिंग आणि हर्षित राणा.
पाकिस्तानचा पूर्ण संघ: साहिबजादा फरहान, फखर जमान, सलमान अली आगा (कर्णधार), अबरार अहमद, फहीम अश्रफ, हारिस रौफ, हसन अली, हसन नवाज, हुसैन तलत, खुशदिल शाह, मोहम्मद हारिस (यष्टीरक्षक), मोहम्मद नवाज, मोहम्मद वसीम ज्युनियर, सैम अयुब, सलमान शाह, सुईम शाह, मुहम्मद अयुब, मुहम्मद शाहफ्रिअन.