TRENDING:

Ind vs Pak Final : तिलक वर्माने संपूर्ण देशाचं मन जिंकलं, भर मैदानात भारतीय जवानांना ठोकलं कडक सल्यूट, पाहा VIDEO

Last Updated:

भारताला हा विजय मिळवून देण्यात तिलक वर्माने मॅच विनिंग खेळी केली.कारण तिलक वर्माने 69 धावांची नाबाद खेळी केली. या खेळीसह त्यांची आणखी एक कृती संपूर्ण देशाच मन जिंकुन गेली.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
tilak varma half century celebration
tilak varma half century celebration
advertisement

Ind vs Pak Final : भारताने अटीतटीच्या सामन्यात आशिया कपच्या फायनलमध्ये पाकिस्तानचा 5 विकेटसने पराभव केला आहे. या विजयासह भारताने नवव्यांदा आशिया कपवर नाव कोरलं आहे.भारताला हा विजय मिळवून देण्यात तिलक वर्माने मॅच विनिंग खेळी केली.कारण तिलक वर्माने 69 धावांची नाबाद खेळी केली. या खेळीसह त्यांची आणखी एक कृती संपूर्ण देशाच मन जिंकुन गेली.ही कृती नेमकी काय होती हे जाणून घेऊयात.

advertisement

खरं तर भारताचा कोणताच खेळाडू मैदानात जास्त काळ विकेटवर टीकत नसताना तिलक वर्मा मैदानात आला होता. यावेळी तिलक वर्माने एकट्याने भारताचा डाव सावरला होता. यावेळी मैदानात खेळताना त्याने अर्धशतक ठोकलं होतं. हे अर्धशतक ठोकताच त्याने सल्यूट ठोकलं.हे कडक सल्यूट त्याने भारतीय जवानांसाठी ठोकलं होतं. खरं तर मैदानात आधीच खेळाडूच्या अॅक्शनवरून वाद रंगले असताना देखील त्याने हे सल्यूट ठोकलं होतं.त्यामुळे त्याच्या या सेलिब्रेशनचही कौतुक होत आहे.

advertisement

कसा रंगला सामना

आशिया कपच्या फायनलमध्ये शेवटच्या ओव्हरपर्यंत रंगलेल्या थरारक सामन्यात भारताने बाजी मारली आहे. भारताने 5 विकेटने हा सामना जिंकला आहे. अशाप्रकारे भारताने नवव्यांदा आशिया कपवर नाव कोरलं आहे.  टीम इंडियाला शेवटच्या ओव्हरमध्ये 6 बॉलमध्ये 10 धावांची आवश्यतकता होती. त्यावेळी तिलक वर्माने 3 बॉलमध्ये 9 धावा काढल्या होत्या. त्यानंतर चौथ्या बॉलवर एक धाव हवी असताना रिंकून चौकार मारून भारताला सामना जिंकवला आहे.  टीम इंडियाच्या विजयाचा शिल्पकार तिलक वर्मा ठरला आहे. त्याने नाबाद 69 धावांची खेळी केली आहे. या व्यतिरीक्त भारताच्या विजयाचं क्रेडीट कुलदीप शर्माला देखील जाते कारण त्याने 4 विकेट काढल्या होत्या.

advertisement

पाकिस्तानने दिलेल्या 147 धावांचा पाठलाग करताना भारताची सूरूवात खराब झाली होती. कारण टीम इंडियाकडून सलामीली आलेला अभिषेक शर्मा अवघ्या 5 धावांवर बाद झाला होता. त्याच्यानंतर कर्णधार सुर्यकुमार यादव मैदानात उतरला होता.मात्र तो देखील 1 धावांवर बाद झाला होता. त्याच्यानंतर शुभमन गिल आणि तिलक वर्मा भारताचा डाव सावरेल असे वाटत होते.पण शुभमन गिल 12 धावांवर बाद झाला होता. त्याच्यानंतर संजू सॅमसन चांगला खेळत होता. पण तो देखील 24 धावा करून बाद झाला.त्याच्यानंतर शिवम दुबे आणि तिलक वर्मा मैदानात होते. हे दोघे मैदानात असताना टीम इंंडियाची हातून मॅच निसटली होती. त्यामुळे भारत सामना जिंकण्याची शक्यता खूप कमी होती.

advertisement

पण तिलक वर्माने एका बाजूने भारताचा डाव सावरून ठेवला.यावेळी त्याला शिवम दुबनेही चांगली साथ दिली होती. दुबेने मोक्याची क्षणी 33 धावांची खेळी केली होती. त्याच्या या खेळीने टीम इंडियाच्या विजयाच्या नजीक पोहोचली होती. कारण टीम इंडियाला 6 बॉलमध्ये 10 धावांची आवश्यकता होती.त्यावेळी तिलकने पहिल्या बॉलवर 2 धावा काढल्या. त्यानंतर दुसऱ्या बॉलवर सिक्स खेचला, याच क्षणी संपूर्ण मॅच भारताच्या पारड्यात आली.त्यानंतर 4 बॉलवर 2 धावांची गरज असताना तिलकने एक धाव काढली.त्यानंतर रिंकून चौथ्या बॉलवर चौकार मारून भारताला आशिया कपं जिंकून दिला.

या सामन्यात तिलक वर्मा 69 धावांवर नाबाद राहिला. या खेळी दरम्यान त्याने 4 षटकार आणि 3 चौकार मारले होते.त्यामुळे भारताच्या विजयाचा खरा शिल्पकार तो ठरला आहे. भारताने नवव्यांदा हा आशिया कप जिंकला आहे. या विजयासह खेळाडूने देशवासियांना दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

पाकिस्तानचा डाव

प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तान शेवटच्या ओव्हरच्या पहिल्याच बॉलवर 146 धावांवर ऑल आऊट झाली होती.पाकिस्तानची सूरूवात चांगली झाली होती. पाकिस्तानकडून साहिबजादा फरहान आणि फखर जमानने पाकिस्तानच्या डावाला आक्रामक सूरूवात करून दिली.साहिबजादा फरहानने 57 धावांची सर्वाधिक खेळी केली होती. या खेळीत त्याने 3 षटकार आणि 5 चौकार लगावले होते. फरहानला फखर जमाननेही चांगली साथ दिली होती. दोघांनी मिळून 84 धावांवर एकही विकेट जाऊ दिली होती.त्यानंतर मात्र फरहाण बाद झाला होता.

त्यानंतर फखर जमान आणि सॅम अयुबने पाकिस्तानचा डाव सावरला होता. पण सॅम अयुब पुन्हा अपयशी ठरला आणि 14 धावांवर बाद झाला. त्यानंतर पाकिस्तानच्या विकेटसची रांगच लागली. फखर जमान 46 धावांवर बाद झाला. या व्यतिरीक्त इतर 8 खेळाडूंना 10 धावांचा आकडाही गाठता आला नाही. आणि पाकिस्तान 146 धावांवर ऑलआऊट झाली होती. भारताकडून कुलदीप यादवने 4, बुमराह,चक्रवर्ती आणि अक्षर पटेलने प्रत्येकी 2-2 विकेट घेतल्या होत्या.

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Ind vs Pak Final : तिलक वर्माने संपूर्ण देशाचं मन जिंकलं, भर मैदानात भारतीय जवानांना ठोकलं कडक सल्यूट, पाहा VIDEO
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल