सॅम अयुब दोनदा गोल्डन डक
सॅम अयुबचं आशिया कपच्या 2 सामन्यांमधलं हे दुसरं गोल्डन डक आहे. याआधी ओमानविरुद्धच्या सामन्यातही सॅम अयुब पहिल्याच बॉलवर शून्य रनवर आऊट झाला होता. शाह फैसलने सॅम अयुबला एलबीडल्ब्यू आऊट केलं होतं.
हार्दिकनंतर बुमराहचाही धक्का
हार्दिक पांड्याने पहिल्याच ओव्हरला पाकिस्तानला धक्का दिल्यानंतर दुसऱ्या ओव्हरला बुमराहनेही विकेट मिळवली. मोहम्मद हॅरिसने बुमराहच्या बॉलिंगवर मोठा शॉट मारण्याचा प्रयत्न केला, पण हार्दिक पांड्याने त्याचा कॅच पकडला. 5 बॉलमध्ये 3 रन करून मोहम्मद हॅरिस आऊट झाला.
advertisement
पाकिस्तानने टॉस जिंकला
या सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली आघा याने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला. या सामन्यात टीम इंडियाने कोणताही बदल केलेला नाही.
भारतीय टीम
अभिषेक शर्मा, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, संजू सॅमसन, शिवम दुबे, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती