आयसीसीने या दोन्ही तक्रारींवर वेगवेगळी सुनावणी घेतली आणि खेळाडूंना त्यांची बाजू मांडायला सांगितलं. पाकिस्तानच्या दोन्ही खेळाडूंना आयसीसीने आचारसंहितेच्या लेव्हल-1 चं उल्लंघन केल्याप्रकरणी दोषी ठरवलं. हारिस राऊफला आयसीसीने दंड ठोठावला, तसंच खेळाची बदनामी केल्याप्रकरणी त्याला ताकीद देऊन सोडण्यात आलं आहे.
दुसरीकडे पाकिस्तानचा ओपनर साहिबजादा फरहान यालाही आयसीसी आचारसंहितेच्या लेव्हल-1 चं उल्लंघन केल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आलं, त्यामुळे साहिबजादालाही ताकीद देऊन सोडण्यात आलं. फरहानने अर्धशतक केल्यानंतर आपली बॅट बंदुकीप्रमाणे चालवली होती. तर हारिस राऊफने भारतीय प्रेक्षकांना पाहून विमान पाडल्याचे हावभाव केले होते.
advertisement
साहिबजादाने गुडघे टेकले
साहिबजादा फरहान, हारिस राऊफ यांच्यासह पाकिस्तान टीमचे मॅनेजर या सुनावणीला हजर होते. पाकिस्तानी टीमच्या हॉटेलमध्ये मॅच रेफरी रिची रिचर्डसन यांच्या समोर या प्रकरणाची सुनावणी झाली. या सुनावणीवेळी मैदानात बंदुकीप्रमाणे सेलिब्रेशन करणाऱ्या साहिबजादा फरहानने गुडघे टेकले. याआधीही खेळाडूंनी सेलिब्रेशन करताना बंदुकीचे हावभाव केल्याचं फरहान म्हणाला. तसंच त्याने सुनावणीवेळी धोनी आणि कोहलीनेही असे हावभाव केल्याचा दाखला दिला.
आपण पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वा भागातून येत असून पख्तून जमातीमध्ये हा पारंपारिक सेलिब्रेशन करण्याचा मार्ग असल्याचं साहिबजादा फरहानने आयसीसीच्या सुनावणीवेळी सांगितलं.