काय म्हणाले मॅच रेफरी?
भारताच्या टी-20 टीमचा कर्णधार सूर्यकुमार यादव याला आयसीसी मॅच रेफरी रिची रिचर्डसन यांनी राजकीय वक्तव्यांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला. 14 सप्टेंबर रोजी आशिया कपमधल्या भारताच्या विजयानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने सूर्यकुमार यादवविरुद्ध तक्रार दाखल केली होती, त्यावर आज सुनावणी झाली.
काय म्हणाला होता सूर्यकुमार यादव?
ग्रुप स्टेजमध्ये झालेल्या सामन्यानंतर सूर्यकुमार यादवने पाकिस्तानविरुद्धचा विजय पहलगाममध्ये मृत्यू झालेल्यांना तसंच भारतीय सैन्याला समर्पित केला होता. सूर्यकुमार यादवचं हे वक्तव्य राजकीय दृष्ट्या प्रेरित असल्याची तक्रार पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आयसीसीकडे केली होती. तसंच सूर्या आणि टीम इंडियाने हस्तांदोलन न केल्याचा उल्लेखही तक्रारीमध्ये करण्यात आला होता.
advertisement
पाकिस्तानच्या दोन खेळाडूंवरही सुनावणी होणार
बीसीसीआयने देखील पाकिस्तानी खेळाडूंविरोधात आयसीसीकडे तक्रार केली होती.या तक्रारीत म्हटले आहे की, भारताविरुद्धच्या सुपर फोर सामन्यादरम्यान साहिबजादा फरहान आणि हरिस रौफ यांनी चिथावणीखोर हावभाव आणि वादग्रस्त वर्तन केले. हरिस रौफने विमान अपघातासारखे हावभाव केले आणि भारतीय खेळाडू अभिषेक शर्मा आणि शुभमन गिल यांना शिवीगाळ केली. साहिबजादा फरहानने अर्धशतक पूर्ण केल्यानंतर "बंदुकीने सेलिब्रेशन" केले.