TRENDING:

IND vs PAK : 'किसी को कुछ बोलना नहीं है...', स्लेजिंगवर सूर्याने हडलमध्ये काय वॉर्निंग दिली होती? Video आला समोर

Last Updated:

IND vs PAK Suryakumar Yadav in Huddle : प्रतिस्पर्धी खेळाडूंना उलट उत्तर देऊ नका किंवा कोणाशीही वाद घालू नका. सूर्याने काय म्हटलं होतं? याचा व्हिडीओ बीसीसीआयने शेअर केला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Suryakumar Yadav Give Clear warning : कोलंबोमध्ये रविवारी झालेल्या टी-20 वर्ल्ड कपमधील हाय-व्होल्टेज मॅचमध्ये भारतीय क्रिकेट टीमने पाकिस्तानचा 61 रन्सनी धुव्वा उडवला. पहिल्यांदा बॅटिंग करताना भारताने 175 रन्सचा डोंगर उभा केला होता. या विजयानंतर भारतीय खेळाडूंच्या कामगिरीपेक्षा कॅप्टन सूर्यकुमार यादव याच्या शांत स्वभावाची आणि संयमी नेतृत्वाची जोरदार चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. सूर्याने पाकिस्तानविरुद्धच्या मॅचपूर्वी हडलमध्ये (मॅचपूर्वी घातलेलं गोल रिंगण) टीम इंडियाच्या खेळाडूंना वॉर्निंग दिली होती.
IND vs PAK Suryakumar Yadav in Huddle
IND vs PAK Suryakumar Yadav in Huddle
advertisement

उलट उत्तर देऊ नका

मैदानावर कोणताही आक्रमक पवित्रा न घेता सूर्याने टीम इंडियाला विजय मिळवून दिला. पाकिस्तानचे बॅटर्स जेव्हा मैदानात आले, तेव्हा टीम हडलमध्ये सूर्याने आपल्या सहकाऱ्यांना खास सूचना दिली होती. त्याने सर्वांना स्पष्टपणे सांगितले की, प्रतिस्पर्धी खेळाडूंना उलट उत्तर देऊ नका किंवा कोणाशीही वाद घालू नका. सूर्याने काय म्हटलं होतं? याचा व्हिडीओ बीसीसीआयने शेअर केला आहे.

advertisement

कोणालाही काहीही बोलू नका

"ओव्हरच्या दरम्यान धावत राहा आणि कोणालाही काहीही बोलू नका (Kisi se kuch bolna nahi). आपल्याला फक्त चांगलं क्रिकेट खेळायचं आहे. आपल्या कौशल्याच्या जोरावरच आपण ही मॅच जिंकणार आहोत," असे शब्द सूर्याने आपल्या टीमला प्रोत्साहित करताना वापरले. त्याच्या या शांत डोक्याने घेतलेल्या निर्णयामुळे भारतीय बॉलर्सनी दबावाखाली न येता टिच्चून बॉलिंग केली अन् पाकिस्तानला गुडघ्यावर आणलं.

advertisement

सूर्यकुमार यादवच्या कॅप्टन्सीचे कौतुक

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोयाबीनच्या दरात वाढ, तूर भाव घसरले, कापसाची काय स्थिती? Video
सर्व पहा

दरम्यान, भारताचे दिग्गज क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनीही सूर्यकुमार यादवच्या या कॅप्टन्सीचे भरभरून कौतुक केले आहे. मॅचमधील परिस्थितीनुसार खेळ बदलण्याची कला सूर्याला अवगत असल्याचे त्यांनी नमूद केले. अमेरिकेविरुद्ध 77/6 अशी अवस्था असताना त्याने टीमला सावरले होते आणि आता पाकिस्तानविरुद्धही त्याने 32 रन्सची संयमी खेळी करत 19 ओव्हरपर्यंत खिंड लढवली.

advertisement

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs PAK : 'किसी को कुछ बोलना नहीं है...', स्लेजिंगवर सूर्याने हडलमध्ये काय वॉर्निंग दिली होती? Video आला समोर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल