हार्दिक पांड्या दुखापतीमुळे खेळत नसल्याचं सूर्यकुमार यादवने टॉसवेळी सांगितलं. खरंतर मागच्या काही वर्षांमध्ये हार्दिक पांड्याचं पाकिस्तानविरुद्धचं रेकॉर्ड उत्कृष्ट राहिलं आहे. पाकिस्तानविरुद्धच्या अनेक विजयांमध्ये हार्दिकने बॅटिंग आणि बॉलिंगमध्ये मोलाचं योगदान दिलं होतं.
हार्दिकला खेळवणं सूर्याची चूक
हार्दिक पांड्याला आशिया कपच्या सुपर-4 मधल्या श्रीलंकेविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात दुखापत झाली होती. खरंतर टीम इंडियासाठी श्रीलंकेविरुद्धचा सामना महत्त्वाचा नव्हता, कारण भारताने आधीच फायनलमध्ये प्रवेश केला होता. तसंच आशिया कपची फायनल भारत-पाकिस्तान यांच्यात होणार हे श्रीलंकेविरुद्धच्या सामन्याआधीच निश्चित झालं होतं. हार्दिक पांड्याला याआधीही दुखापतींमुळे मोठ्या स्पर्धांना मुकावं लागलं आहे. हार्दिक पाकिस्तानविरुद्ध चांगला खेळतो हे माहिती असताना खरंतर त्याला श्रीलंकेविरुद्ध विश्रांती देणं गरजेचं होतं, पण तरीही त्याला संधी दिली गेली आणि याच सामन्यात त्याला दुखापत झाली. या दुखापतीमुळे त्याला फायनलसारख्या महत्त्वाच्या सामन्यात खेळता आलं नाही.
advertisement
हार्दिक पांड्याच्या गैरहजेरीमध्ये शिवम दुबेने त्याची कमी जाणवू दिली नाही. दुबेने 3 ओव्हरमध्ये फक्त 23 रन दिल्या, यानंतर त्याने बॅटिंगमध्ये 22 बॉलमध्ये 33 रनची मॅच विनिंग खेळी केली. दुबेने तिलक वर्मासोबत 60 रनची पार्टनरशीप करून भारताचा विजयही निश्चित केला, पण या सामन्यात टीमचा विजय झाला असला तरी कर्णधार सूर्याने श्रीलंकेविरुद्ध हार्दिकला खेळवून केलेली चूक भारताला सुदैवाने पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात महागात पडली नाही.