India vs Pakistan : भारत पाकिस्तान सामना म्हटलं तर राडा झालाच पाहिजे. राडा झालाच नाही तर तो भारत आणि पाकिस्तान सामना कुठला. आजच्या सामन्यात बघा ना टीम इंडियाचा 14 वर्षीय स्टार खेळाडूने एका पाकिस्तानी खेळाडूला दम दिला आहे.त्याचं झालं असं पाकिस्तानी खेळाडू वैभव सूर्यवंशीला डिवचण्याचा प्रयत्न करत होता.पण वैभवने त्याची बोलती बंद केली आहे.
advertisement
भारताकडून सलामीला वैभव सूर्यवंशी आणि प्रियांश आर्या उतरला होता. यावेळी वैभव सूर्यवंशीने पहिल्या बॉलपासून पाकिस्तानी गोलंदाजीसमोर प्रहार करायला सूरूवात केली होती. तब्बल तीन ओव्हर त्याने पाकिस्तानी बॉलरला धू धू धूतलं होतं. नंतर त्याचं पुढे जाऊन पाकिस्तानी गोलंदाज उबेद खानसोबत वाद झाला होता.
त्याचं झालं असं की तिसऱ्या ओव्हरमध्ये उबेदने एक जोरदार बाऊन्स बॉल टाकला होता.जो थेट वैभवच्या डोक्यावरून गेला होता. हा बॉल टाकल्यानंतर उबेद वैभवकडे पाहून काहीतरी पुटपुटत होता.त्यामुळे उबेदला पुटपुटताना पाहून वैभवने त्याला जा ना बॉल टाक ना (Jaa Na Ball Dal Na) अशा शब्दात त्याला उत्तर देऊन पळवून लावलं. विशेष म्हणजे वैभव जे बोलला ते स्टम्प माईकमध्ये कैद झालं होतं. त्यामुळे मोठा राडा झाला होता.
एसीसी मेन्स आशिया कप रायझिंग स्टार्स स्पर्धेत पाकिस्तानच्या लिंबूटींबू संघाने आयपीएल स्टार्सनी भरलेल्या भारतीय संघाचा 8 विकेटने पराभव केला आहे. भारताने प्रथम फलंदाजी करताना 136 धावा ठोकल्या होत्या. या धावांचा यशस्वी पाठलाग करत पाकिस्तानने हा सामना आठ विकेटस राखून जिंकला आहे. पाकिस्तानच्या विजयाचा शिल्पकार माज सदाकत ठरला आहे.कारण त्याने 79 धावांची सर्वाधिक खेळी केली आहे.
पाकिस्तान अ (प्लेइंग इलेव्हन): मोहम्मद नईम, माझ सदाकत, यासिर खान, मोहम्मद फैक, इरफान खान (कर्णधार), साद मसूद, गाझी घोरी (उप कर्णधार), शाहिद अजीज, उबेद शाह, अहमद दानियाल, सुफियान मुकीम
भारत अ (प्लेइंग इलेव्हन): वैभव सूर्यवंशी, प्रियांश आर्य, नेहल वढेरा, नमन धीर, जितेश शर्मा (कर्णधार/विकेटकिपर), रमणदीप सिंग, आशुतोष शर्मा, हर्ष दुबे, यश ठाकूर, गुरजपनीत सिंग, सुयश शर्मा
