TRENDING:

PAK vs IND : पाकिस्तानमुळे 36 महिने टीम इंडियातून बाहेर, आता सुट्टी नाही! वरुण चक्रवर्ती पाकिस्तानला देणार 'चकवा', पाहा कसं?

Last Updated:

IND vs PAK Varun Chakravarthy New Plan : टीम इंडियाचा स्टार स्पिनर वरुण चक्रवर्ती आता पाकिस्तानविरुद्धच्या आगामी हाय-व्होल्टेज मॅचमध्ये एक नवीन 'मिस्ट्री' अस्त्र बाहेर काढण्याच्या तयारीत आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Pakistan Vs India T20WC : सर्वांनाच आठवत असेल, 2021 चा टी-ट्वेंटी वर्ल्ड कप... पाकिस्तानने भारताला 10 विकेट्सने हरवलं अन् तिथून टीम इंडियाच्या एका स्टार खेळाडूच्या करियरला ब्रेक लागला. हा खेळाडू दुसरा तिसरा कुणी नसून वरूण चक्रवर्ती होता. पाकिस्तानविरुद्धच्या या सामन्यात वरूण चक्रवर्तीला 4 ओव्हरमध्ये एकही विकेट घेता आली नव्हती अन् त्याने 33 धावा दिल्या होत्या. त्यानंतर वरूण चक्रवर्ती तब्बल 3 वर्ष टीम इंडियातून बाहेर झाला. आता वरुण चक्रवर्तीसाठी जुना हिशोब चुकता करण्याची मोठी संधी आहे. त्यासाठी त्याने एक रणनिती देखील तयार केलीये.
IND vs PAK Varun Chakravarthy New mystery Plan Against Pakistan
IND vs PAK Varun Chakravarthy New mystery Plan Against Pakistan
advertisement

नवीन 'मिस्ट्री' अस्त्र बाहेर काढणार

स्टार स्पिनर वरुण चक्रवर्ती आता पाकिस्तानविरुद्धच्या आगामी हाय-व्होल्टेज मॅचमध्ये एक नवीन 'मिस्ट्री' अस्त्र बाहेर काढण्याच्या तयारीत आहे. कोलंबोच्या मैदानावर होणाऱ्या या महत्त्वाच्या लढतीत वरुण आपल्या गोलंदाजीतील वैविध्य दाखवण्यासाठी सज्ज झाला असून, त्याने तसे संकेतही दिले आहेत. गेल्या काही काळापासून तो आपल्या बॉलिंगवर विशेष मेहनत घेत असून रविवारी होणाऱ्या सामन्यात पाकिस्तानी बॅटर्सला चकवा देण्यासाठी वरूण चक्रवर्ती सज्ज आहे. पाकिस्तानला वरूणने इशारा दिलाय.

advertisement

काय म्हणाला वरूण चक्रवर्ती?

मी काही नवीन गोष्टींवर काम करत आहे आणि ही माझी सतत चालणारी प्रक्रिया आहे. माझ्याकडे नेहमीच काहीतरी नवीन बॉल तयार असतो. जर माझ्यात पुरेसा आत्मविश्वास असेल, तर मी पुढच्या मॅचमध्ये त्याचा वापर नक्कीच करेन, असं वरूण चक्रवर्ती म्हणाला आहे. श्रीलंकेतील खेळपट्ट्या संथ असल्या तरी येथील बाउंड्री मोठ्या आहेत, याचा फायदा घेण्यासाठी तो चेंडू हवेत अधिक फ्लाईट देण्याचा प्रयत्न करणार आहे. आर. प्रेमदासा स्टेडियमवरील परिस्थिती त्याच्या फिरकीसाठी पूरक ठरू शकते.

advertisement

बॅटर्सच्या दांड्या गुल

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
अभ्यास केला अन् प्रेमही, शेवटी IAS अन् मनासारखी बायको; जी श्रीकांत Love Story
सर्व पहा

दरम्यान, गेल्या काही वर्षांत वरुणने आपल्या फॉलो थ्रू मध्ये मोठे बदल केले आहेत. त्याने साईड-स्पिन ऐवजी ओव्हर-स्पिनवर अधिक लक्ष केंद्रित केलंय, ज्यामुळे त्याचा बॉल खेळपट्टीवर पडल्यानंतर वेगाने फलंदाजाकडे येतो अन् बॅटरला काहीही कळत नाही. बॉल कसा येतोय, हे लक्षात येण्याआधीच बॅटर्सच्या दांड्या गुल झालेल्या असतात.

advertisement

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
PAK vs IND : पाकिस्तानमुळे 36 महिने टीम इंडियातून बाहेर, आता सुट्टी नाही! वरुण चक्रवर्ती पाकिस्तानला देणार 'चकवा', पाहा कसं?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल