TRENDING:

Team India : 16 मॅचमध्ये एकही अर्धशतक नाही, जागा अडवून बसला 'पोस्टर बॉय', मुंबईच्या खेळाडूवर अन्याय!

Last Updated:

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या 5 टी-20 मॅचच्या सीरिजला सुरूवात झाली आहे. टी-20 वर्ल्ड कपच्या आधी फक्त 10 मॅच शिल्लक असताना या सीरिजला आणखी महत्त्व प्राप्त झालं आहे, पण वर्ल्ड कपच्या तोंडावर टीम इंडियाचं टेन्शन वाढलं आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
कटक : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या 5 टी-20 मॅचच्या सीरिजला सुरूवात झाली आहे. टी-20 वर्ल्ड कपच्या आधी फक्त 10 मॅच शिल्लक असताना या सीरिजला आणखी महत्त्व प्राप्त झालं आहे, पण वर्ल्ड कपच्या तोंडावर टीम इंडियाचं टेन्शन वाढलं आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात टीमचा उपकर्णधार शुभमन गिल पुन्हा एकदा अपयशी ठरला आहे. मॅचच्या तिसऱ्याच बॉलला शुभमन गिल 2 बॉलमध्ये 4 रन करून आऊट झाला आहे. मागच्या 16 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये गिलला एकही अर्धशतक करता आलेलं नाही.
16 मॅचमध्ये एकही अर्धशतक नाही, जागा अडवून बसला 'पोस्टर बॉय',  मुंबईच्या खेळाडूवर अन्याय!
16 मॅचमध्ये एकही अर्धशतक नाही, जागा अडवून बसला 'पोस्टर बॉय', मुंबईच्या खेळाडूवर अन्याय!
advertisement

सप्टेंबर महिन्यात आशिया कपच्या वेळी शुभमन गिलचं टीम इंडियामध्ये कमबॅक झालं, याचसोबत त्याला टी-20 टीमचं उपकर्णधारही करण्यात आलं. गिलचं टीममध्ये कमबॅक झाल्यामुळे संजू सॅमसनला त्याची ओपनिंगची जागा सोडून मिडल ऑर्डरला बॅटिंग करावी लागली, पण संजू मिडल ऑर्डरमध्ये अपयशी ठरला आणि टीमबाहेरही गेला, पण गिल मात्र लागोपाठ 16 सामन्यांमध्ये अपयशी ठरल्यानंतरही त्याला संधी मिळत आहे.

advertisement

शुभमन गिलने 34 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 29 च्या सरासरी आणि 140.64 च्या स्ट्राईक रेटने 841 रन केले आहेत. टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये गिलच्या नावावर 3 अर्धशतकं आणि एका शतकाचा समावेश आहे. गिलने केलेलं हे शतक न्यूझीलंडविरुद्ध आलं आहे, तर तीन अर्धशतकांपैकी दोन अर्धशतकं झिम्बाब्वे आणि एक वेस्ट इंडिजविरुद्ध आलं आहे. गिलचं टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधलं शेवटचं अर्धशतक 13 जुलै 2024 ला झिम्बाब्वेविरुद्ध आलं होतं.

advertisement

गिलचे मागच्या 16 सामन्यांमधले स्कोअर

मागच्या 16 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये गिलने 13, 34, 39, 20, 10, 5, 47, 29, 4, 12, 37, 5, 15, 12, 46, 29, 4 असा आहे. या 16 सामन्यांमध्ये गिलला फक्त 5 वेळा 30 रनचा आकडा पार करता आला आहे, त्यामुळे टी-20 वर्ल्ड कपआधी शुभमन गिलची ही कामगिरी टीम इंडियाची चिंता वाढवणारी नक्कीच आहे.

advertisement

जयस्वालला संधी नाही

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
उपचारासाठी पैसे नाहीत, नो टेन्शन! पुण्यातलं अनोखं हॉस्पिटल, इथं माणूस महत्त्वाचा
सर्व पहा

शुभमन गिलचं कमबॅक झाल्यानंतर संजू सॅमसन टीमबाहेर झालाच, पण मुंबईकर यशस्वी जयस्वाललाही टी-20 फॉरमॅटमध्ये उत्कृष्ट कामगिरी करूनही संधी मिळत नाहीये. यशस्वी जयस्वालने 23 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 36.15 ची सरासरी आणि 164.32 च्या स्ट्राईक रेटने 723 रन केले आहेत, यात 5 अर्धशतकं आणि एका शतकाचा समावेश आहे.

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Team India : 16 मॅचमध्ये एकही अर्धशतक नाही, जागा अडवून बसला 'पोस्टर बॉय', मुंबईच्या खेळाडूवर अन्याय!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल