सिमन हार्मरच्या या कामगिरीबद्दल त्याला प्लेअर ऑफ द मॅच देऊन गौरवण्यात आलं, पण हा पुरस्कार मिळाल्यानंतर हार्मरने टीम इंडियाच्या जखमेवर मीठ चोळलं आहे. भारताचे तीन खेळाडू खराब शॉट मारून आऊट झाल्याचं हार्मर अप्रत्यक्षपणे म्हणाला आहे. 'मला जुरेल, जडेजा आणि पंतची विकेट मिळाली, याबद्दल मी नशीबवान आहे. मी टाकलेले हे तिन्ही बॉल माझे सर्वोत्तम नव्हते. या विजयामुळे मी आनंदी आहे', असं हार्मर म्हणाला आहे.
advertisement
हार्मरच्या बॉलिंगवर ध्रुव जुरेलने मोठा शॉट मारण्याचा प्रयत्न केला, पण डीप मिड विकेटवर कॉर्बिन बॉशने त्याचा कॅच पकडला. यानंतर ऋषभ पंतचाही शॉट चुकला आणि हार्मरने स्वत:च्याच बॉलिंगवर कॅच पकडला. पुढे हार्मरच्या बॉलिंगवर जडेजा एलबीडब्ल्यू आऊट झाला. भारताकडून वॉशिंग्टन सुंदरने सर्वाधिक 31 रन केल्या, तर अक्षर पटेलने 26 आणि जडेजाने 18 रनची खेळी केली. ध्रुव जुरेल 13 रन करून माघारी परतला.
हार्मरच्या 4 विकेटशिवाय मार्को यानसन आणि केशव महाराज यांना 2-2 तर एडन मार्करमला 1 विकेट मिळाली. कोलकात्यामधल्या या पराभवानंतर टीम इंडिया 1-0 ने पिछाडीवर आहे. सीरिजची दुसरी टेस्ट 22 नोव्हेंबरपासून गुवाहाटीमध्ये खेळवली जाणार आहे. सीरिज वाचवण्यासाठी टीम इंडियाला हा सामना जिंकावा लागणार आहे, अन्यथा न्यूझीलंडनंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्धही घरच्या मैदानात भारताला व्हाईट वॉशने पराभव पत्करावा लागेल. याआधी मागच्या वर्षी न्यूझीलंडने टीम इंडियाचा भारतामध्ये 3-0 ने पराभव केला होता.
