दक्षिण आफ्रिकेकडून बार्टमनला सर्वाधिक 4 विकेट मिळाल्या तर एनगिडी, मार्को यानसन आणि सिपामला यांना 2-2 विकेट घेण्यात यश आलं. टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादव आणि उपकर्णधार शुभमन गिल या सामन्यात पुन्हा एकदा अपयशी ठरले. गिल पहिल्याच बॉलला शून्य रनवर तर सूर्यकुमार यादव 5 रन करून माघारी परतला.
एका डीआरएसने फिरला सामना
advertisement
शुभमन गिल पहिल्याच बॉलला आऊट झाल्यानंतरही अभिषेक शर्माने दक्षिण आफ्रिकेच्या बॉलिंगवर आक्रमण केलं. तर दुसरीकडे सूर्यकुमार यादवला मोठी खेळी करण्याची गरज होती. पण मार्को यानसनने टाकलेला बॉल सूर्याच्या बॅटच्या एजला लागला आणि दक्षिण आफ्रिकेचा विकेट कीपर क्विंटन डिकॉकच्या हातात गेला. यानंतर लगेच मार्को यानसनने अपील केलं, पण अंपायरने सूर्यकुमार यादवला नॉट आऊट दिलं. यानंतर मार्को यानसन दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडन मार्करमकडे डीआरएस घ्यायचा आग्रह करत होता. एडन मार्करमने बॅटला बॉल लागला का नाही? याबद्दल डिकॉकला विचारणा केली, पण डिकॉकने मला माहिती नाही, असं उत्तर दिलं.
मार्को यानसन आग्रह करत होता म्हणून कर्णधार मार्करमने शेवटच्या क्षणी डीआरएस घेतला, यानंतर बॉल सूर्यकुमार यादवच्या बॅटला लागल्याचं स्पष्ट झालं आणि त्यानंतर दक्षिण आफ्रिकेने टीम इंडियाला एकामागोमाग एक धक्के द्यायला सुरूवात केली. या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला, यानंतर क्विंटन डिकॉकच्या 90 रनच्या खेळीमुळे दक्षिण आफ्रिकेने 20 ओव्हरमध्ये 4 विकेट गमावून 213 रनपर्यंत मजल मारली.
