खरं तर आज साधारण दुपारी 2.30 च्या दरम्यान कोलकत्ताच्या मैदानातून भारतासाठी वाईट बातमी समोर आली होती. ईडन गार्डनच्या मैदानावर पहिल्या टेस्ट सामन्यात साऊथ आफ्रिकेने भारताचा अवघ्या 30 धावांनी लाजिरवाणा पराभव केला होता. हा सामना भारत सहज जिंकू शकली असती पण भारताचा पराभव झाला होता,त्यामुळे चाहत्यांची प्रचंड निराशा झाली होती. तसेच गौतम गंभीर आणि टीम इंडियावर प्रचंड टीका सूरू होती.
advertisement
भारतीय खेळाडूंवर ही टीका सूरू असतानाच, तिकडे भारताच्या अ संघाने साऊथ आफ्रिकेचा पराभव केला आहे.खरं तर भारत आणि साऊथ आफ्रिका यांच्याच टेस्ट सामन्यासोबच भारत अ आणि साऊथ आफ्रिका अ यांच्यात दुसरा अनधिकृत सामनाही पार पडला. या सामन्यात भारत अ संघाने 9 विकेटस राखून साऊथ आफ्रिकेचा पराभव केला आहे.त्यामुळे भारताने पाच तासाच टेस्ट सामन्याच्या पराभवाचा बदला घेतला होता.
या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करणाऱ्या साऊथ आफ्रिकेच्या अ संघाला 132 धावांवर ऑल आऊट केले होते. आफ्रिकेकडून रिवाल्डो मुनसॅमीन सर्वाधिक 33 धावा केल्या होत्या. या व्यतिरीक्त कोणत्याही खेळाडूला मोठ्या धावा करता आल्या होत्या. भारताकडुन निशांत संधुने 4,हर्षित राणाने 3,प्रसिद्ध कृ्ष्णा 2 आणि तिलक वर्माने 1 विकेट घेतली होती.
दरम्यान आफ्रिकेने दिलेल्या 135 धावांचा पाठलाग करताना भारताने 9 विकेटने हा सामना जिंकला आहे. भारताकडून ऋतुराज गायकवाडने 68 नाबाद विजयी खेळी केली होती.त्याच्यासोबत तिलक वर्मा 29 वर नाबाद राहिला होता. तर अभिषेक शर्मा 32 वर बाद झाला होता. त्यामुळे भारताने 9 विकेटने सामना जिंकला होता. अशाप्रकारे भारताने तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत 2-0 ने आघाडी घेतली आहे. त्यामुळे भारताच्या ज्यूनिअर संघाने पाच तासात भारताच्या सिनिअर संघाचा बदला घेतला आहे.
