TRENDING:

VIDEO : स्मृती मानधनाला भेळ, दीप्तीला पनीर... खेळाडूंच्या आवडीनिवडी लक्षात कशा राहतात? PM मोदींनी सिक्रेट सांगितलं

Last Updated:

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भारतीय महिला खेळाडूंच्या आवडी निवडी लक्षात असल्याचे पाहायला मिळाले. विशेष म्हणजे या गोष्टी लक्षात कशा राहतात? याचे कारण देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडिओत सांगत आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
team india women meet pm narendra modi
team india women meet pm narendra modi
advertisement

Womens World Cup team Meet PM Narendra Modi : नवी मुंबईच्या डीवाय पाटील स्टेडिअमवर टीम इंडियाने साऊथ आफ्रिकेचा पराभव वुमेन्स वर्ल्ड कप जिंकला आहे. या विजयानंतर टीम इंडियाने 5 नोव्हेंबर 2025 ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. या भेटीचा व्हिडिओ आज समोर आला आहे. या व्हिडिओत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भारतीय महिला खेळाडूंच्या आवडी निवडी लक्षात असल्याचे पाहायला मिळाले. विशेष म्हणजे या गोष्टी लक्षात कशा राहतात? याचे कारण देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडिओत सांगत आहेत.

advertisement

खरं तर पहिल्यांदा टीम इंडियाच्या महिला संघाने पंतप्रधान नरेंद्र मोदी याची भेट घेतली. या भेटी दरम्यान टीम इंडियाच्या सर्वच खेळाडूंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी छान गप्पा टप्पा मारल्या. या गप्पा टप्पानंतर महिला खेळाडू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खास मेजवाणीही दिली.

advertisement

पहिल्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिला खेळाडूंना खास लाडू दिले. यावेळी पतंप्रधान मोदी यांनी सर्वांची नाव घेऊन त्यांना लाडू घेण्यास आग्रह केला. यावेळी अनेक खेळाडूंनी लाडू घेतले. ज्यावेळेस स्मृती मानधना लाडू घ्यायला गेली त्यावेळेस तिने मी पहिल्यांदाच खात असल्याचे सांगितले.यावर पंतप्रधान मोदी यांनी, तुमच्यासाठी भेल आणली आहे. असे म्हणताच स्मृती म्हणाली मला खूप आवडतं. आणि डीएसपीसाठी (दीप्ती शर्मा) पनीर आहे.यानंतर शेवटी कर्णधार हरमनप्रीत कौरने लाडू घेतला. या दरम्यान पंतप्रधान खेळाडूंना हे देखील म्हणतात की आता तुम्हाला खाण्यापासून रोखणार नाही ना.

advertisement

सर्व खेळाडू खात असताना प्रतिका रावल व्हिलचेअरवर बसलेली असते यावेळी पंतप्रधान मोदी तिला विचारतात, तुला काय आवडतं? असे म्हणताच समोरील टेबलवरील स्नॅक्स तिला खायला देतात. तुला आवडतं की नाही? असे म्हणताच एकच हशा पिकतो.

advertisement

दरम्यान खेळाडूंच्या नाश्त्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी चर्चेदरम्यान दीप्ती शर्माच्या हातावरील हनुमानाचा टॅटू आणि इस्टाग्रामवरील जय श्री रामचाही उल्लेख करतात. त्यामुळे खेळाडूंना प्रश्न पडतो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या गोष्टी लक्षात राहतात कशा? शेवटी राहून राहुन स्मृती मानधनाच त्यांना विचारते, तुम्हाला या सर्व गोष्टींची आठवण कशी राहते? यावर पंतप्रधान मोदी सांगतात मी वर्तमानमध्ये जगतो.या उत्तरानंतर सगळ्यांच्या चेहऱ्यावर हास्य उमलते.या संदर्भातला व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
3 ते 4 लाख उत्पन्न देणारा बिजल्या, शेतकऱ्याने 11 लाखांना का विकला?
सर्व पहा

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
VIDEO : स्मृती मानधनाला भेळ, दीप्तीला पनीर... खेळाडूंच्या आवडीनिवडी लक्षात कशा राहतात? PM मोदींनी सिक्रेट सांगितलं
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल