हे जीवनदान मिळाल्यानंतर जितेश शर्माने बार्टमनला सिक्स मारली, पण त्यानंतर तो फार काळ खेळपट्टीवर टिकू शकला नाही. मोठा शॉट मारताना जितेशने सिपामला याला विकेट दिली. 17 बॉलमध्ये 27 रन करून जितेश शर्मा आऊट झाला. जितेशची विकेट जाताच टीम इंडियाच्या उरल्यासुरल्या आशाही मावळल्या. जितेशने त्याच्या खेळीमध्ये दोन फोर आणि दोन सिक्स मारले.
advertisement
टीम इंडियाचा 51 रननी पराभव
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात टीम इंडियाचा 51 रननी दारुण पराभव झाला. टीम इंडियाने टॉस जिंकून दक्षिण आफ्रिकेला पहिले बॅटिंगसाठी बोलावले. यानंतर, क्विंटन डी कॉक (90) च्या जलद अर्धशतकाच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने 4 आऊट 213 रन केल्या. प्रत्युत्तरात, तिलक वर्माच्या अर्धशतकाच्या जोरावर टीम इंडियाचा 19.1 ओव्हरमध्ये 162 रनवर ऑलआऊट झाला.
डी कॉकच्या 46 बॉलच्या या खेळीत सात सिक्स आणि पाच फोर होते. डोनोवन फरेराने नाबाद 30, कर्णधार एडेन मार्करामने 29 आणि डेव्हिड मिलरने 20 रनचे योगदान दिले. भारतीय बॉलिंगमध्ये वरुण चक्रवर्तीने २९ रनमध्ये दोन विकेट घेतल्या, तर अक्षर पटेलला एक विकेट घेण्यात यश आलं.
