खरं तर सामन्याच्या चौथ्या दिवशी साऊथ आफ्रिकेसमोर 417 धावांचे लक्ष्य होते. या धावांचा पाठलाग सूरू असताना भारतीय गोलंदाजांना विकेटसच मिळत नव्हत्या. यावेळी मोहम्मद सिराजचा आफ्रिकन बॅटसमन लेसेगो सेनोकवेनसोबत राडा झाला होता. या दरम्यान दोघांमध्ये शाब्दीक बाचाबाची झाली होती.
advertisement
लेसेगो सेनोकवेन सिराजच्या गोलंदाजीचा वेग आणि उसळीविरूद्ध चांगली फलंदाजी करत होता. हेच पाहून सिराज प्रचंड चिडला होता आणि त्याने लेसेगो सेनोकवेन सोबत मैदानात वाद घातला होता. मैदानात यावेळी दोघांमध्ये शाब्दीक बाचाबाची झाली होती. या भांडणाचा व्हिडिओ आता व्हायरल झाला आहे.
कसा रंगला सामना
खरं तर सामन्याच्या चौथ्या आणि शेवटच्या दिवशी साऊथ आफ्रिकेसमोर 417 धावांचे लक्ष्य होते, तर भारताला हा सामना जिंकण्यासाठी साऊथ आफ्रिकेला ऑल आऊट करणे गरजेचे होते. पण शेवटच्या दिवशी साऊथ आफ्रिकने तगडी फाईट देत भारताचा 5 विकेटने पराभव केला आहे. भारताने दिलेल्या या 417 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना जॉर्डन हरमनने 91 धावा, लेसेगो सेनोकवाने 77,झुबेर हमजाने 77 धावांची खेळी केली होती.या खेळाडूंसोबत टेम्बा बावुमाने 59 आणि कॉनोर ईस्टरहुजेनने 52 धावांची नाबाद अर्धशतकीय खेळी केली.या खेळीच्या बळावर साऊथ आफ्रिकेने 417 धावांचा भलं मोठं लक्ष्य गाठलं आणि सामना जिंकला.
तत्पु्वी भारताने 382 वर 7 विकेट असा दुसरा डाव घोषित केला होता.यावेळी पहिल्या डावातून मिळालेल्या 34 धावांच्या बळावर भारताने 417 धावांच लक्ष्य ठेवलं होतं. भारताकडून दुसऱ्या डावात ध्रुव जुरेलने नाबाद 127 धावांची शतकीय खेळी केली होती. त्याच्यासोबत पंतने 65 आणि हर्ष दुबेने 84 धावांची अर्धशतकीय खेळी केली होती.या धावांच्या बळावर भारताने 7 विकेट 382 वर डाव घोषित केला होता.
तर याआधी आफ्रिकेचा पहिला डाव 221 वर ऑलआऊट झाला होता. आफ्रिकेकडून कर्णधार एमजे अकरमनने 134 धावांची सर्वाधिक खेळी होती. तर भारताकडून पहिल्या डावात ध्रुव ज्युरेलने 132 धावांची शतकीय खेळी केली होती.या खेळीच्या बळावर भारत पहिल्या डावात 255 वर ऑल आऊट झाला होता.
हा सामना पाहता भारताचा टॉप ऑर्डर या सामन्यात अपयशी ठरला होता.विशेष म्हणजे भारताच्या टॉप ऑर्डरमधील हेच खेळाडू साऊथ आफ्रिके विरूद्ध खेळणार आहेत.त्यामुळे मालिकेआधीच हे खेळाडू अपयशी ठरले आहेत.त्यामुळे गंभीरला कोलकत्तात पाऊल ठेवण्याआधी मोठा झटका बसला आहे.
